Join us  

West bengal elections 2021 : भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनंही BJPच्या उमेदवारावर मिळवला विजय, अशोक दिंडानं मारली बाजी

West Bengal Election Result 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 6:53 PM

Open in App

West Bengal Election Result 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं दणदणीत विजय प्राप्त केला आहे. तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर शिबपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणाऱ्या भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ( Manoj Tiwari) यानं भाजपाच्या जेपी रतीन चक्रवर्ती यांचा ३२ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. 

२०१६मध्ये याच विधानसभा क्षेत्रातून तृणमूल काँग्रेसच्या जतू लाहिरी यांनी  AIFB च्या जगन्नाथ भट्टाचार्च यांच्यावर २७,०१४ मतांनी विजय मिळवला होता. २०११मध्येही TMCच्या लाहिरी यांनी ४६,४०४ मतांना भट्टाचार्य यांच्यावर विजय मिळवला होता. २०१९मध्ये TMCनं लोकसभा निवडणूकीतही येथून सर्वाधिक मत घेतली होती. मनोज तिवारीनं १२ वन डेत २८७ धावा आणि ३ ट्वेंटी-20 १५ धावा केल्या आहेत.

भारताचा माजी खेळाडू व मोयना विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अशोक दिंडा ( Ashok Dinda) चा विजय झाला आहे. दिंडानं १३ वन डे व ९ ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे १२ व १७ विकेट्स घेतल्या. ११६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४२० विकेट्स आहेत. याशिवाय ९८ लिस्ट ए व १४७ ट्वेंटी-२० सामन्यांत त्यानं अनुक्रमे १५१ व १५१ विकेट्स घेतल्या आहेत. 

 

प.बंगालची वाघीण जिंकली, आता कोरोनाकडे लक्ष देऊया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा"ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभीमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल, अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प.बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया", अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१तृणमूल काँग्रेस