West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक

West Bengal Elections 2021 : पश्चिम बंगालमधील वातावरण अधिक तापू लागले आहेत. मोठ्या संख्येनं येथे सुरक्षा व केंद्रीय बळाची सुरक्षा पुरवली जात असूनही हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 01:14 PM2021-03-31T13:14:05+5:302021-03-31T13:15:31+5:30

whatsapp join usJoin us
West Bengal Elections 2021 : Ex-cricketer Ashoke Dinda gets Y+ security day after attack during election campaign in Bengal | West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक

West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

West Bengal Elections 2021 : पश्चिम बंगालमधील वातावरण अधिक तापू लागले आहेत. मोठ्या संख्येनं येथे सुरक्षा व केंद्रीय बळाची सुरक्षा पुरवली जात असूनही हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. मंगळवारी भारताचा माजी खेळाडू व मोयना विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अशोक दिंडा ( Ashok Dinda) याच्यावर अज्ञातांना हल्ला केला. पूर्व मिदनापूर येथील मोयना येथे प्रचारासाठी गेलेल्या दिंडाच्या गाडीवर लाठ्या व दगडांनी हल्ला केला गेला आणि त्यात दिंडाच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याच्या गाडीचेही खूप नुकसान झालं आहे. या घटनेचा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. एक दिवसपूर्वी नंदीग्रम येथे भाजपाचे नेता शुभेंदू अधिकारी यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दिंडाला Y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

मुंबई इंडियन्सला पराभूत करणं अवघड, 'हे' खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी



दिंडाच्या मॅनेजरने सांगितले की, सायंकाळी ४.३० वाजता रोड शो पूर्ण करून माघारी परतत असताना शंभरेक लोकांनी रॉड आणि दगडांनी हल्ला केला. त्याच्या गाडीवर दगडं फेकली गेली आणि त्यात दिंडाला दुखापत झाली. ही घटना मोयना बाजार येथे झाली. तेथे तृणमूल काँग्रेसचा स्थानिक गुंडा शाहजहान अली आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केला.  रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!

दिंडानं १३ वन डे व ९ ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे १२ व १७ विकेट्स घेतल्या. ११६ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४२० विकेट्स आहेत. याशिवाय ९८ लिस्ट ए व १४७ ट्वेंटी-२० सामन्यांत त्यानं अनुक्रमे १५१ व १५१ विकेट्स घेतल्या आहेत. खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!

Web Title: West Bengal Elections 2021 : Ex-cricketer Ashoke Dinda gets Y+ security day after attack during election campaign in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.