IPL 2024 Lucknow Super Giants Vice Captain: आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने एक मोठी घोषणा केली आहे. संघाने आगामी हंगामासाठी नवीन उपकर्णधाराची घोषणा केली आहे. मागील हंगामात लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्याने लखनौच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. राहुल संघात असताना त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. पण, आता त्याच्याकडून हे पद काढून घेण्यात आले असून वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
मागील हंगामात कर्णधार म्हणून कृणाल पांड्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्याकडून हे पद हिरावण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ प्लेऑफमध्ये नक्कीच पोहोचला पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याने फलंदाज आणि गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली नाही.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, काइल मेयर्स, देवदत्त पडिक्कल, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, कृणाल पांड्या, युधवीर सिंग, यश ठाकूर, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, मयंक यादव, शामर जोसेफ, मोहसीन खान, कृष्णप्पा गौतम, अर्शीन कुलकर्णी, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेव्हिड विली, ॲश्टन टर्नर, मोहम्मद अर्शद खान.
दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. यंदा आयपीएलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल नेमकी कुठे खेळवायची हाही प्रश्न होता. पण, याचे उत्तर मिळाले आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल.
IPL 2024 वेळापत्रक
- २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
- २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
- २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
- २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
- २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
- २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
- ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
- ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
- १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
- २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
- ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
- ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
- ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ