Join us

Andre Russell : ६,६,६,६,६,६! आंद्रे रसेलने खेचले सलग ६ चेंडूंत ६ सिक्स, २४ चेंडूंत कुटल्या ७२ धावा, Video

Andre Russell smashes six 6s in a row - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची फटकेबाजी पाहून काल कोलकाता नाइट रायडर्सचे चाहते खूप आनंदी झाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 16:28 IST

Open in App

Andre Russell smashes six 6s in a row - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची फटकेबाजी पाहून काल कोलकाता नाइट रायडर्सचे चाहते खूप आनंदी झाले.. सिक्स्टी ( 6IXTY ) या नव्या क्रिकेट लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या रसेलने वादळी खेळी केली. त्याने सेंट किट्स व नेव्हिस पॅट्रीओट्स संघाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. रसेलने सहा चेंडूंत सहा षटकार खेचून वादळ आणलं आणि अवघ्या २४ चेंडूंत ७२ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. 

नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ५ बाद १५५ धावांचा डोंगर उभा केला. टीम सेइफर्ट ( २२) व टिऑन वेवस्टर ( २२) यांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर रसेलने तिसऱ्या क्रमांकावर येताना वादळ आणले. त्याने २४ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करताना ७२ धावा कुटल्या. डॉमिनिक ड्रेक्सने टाकलेल्या सातव्या षटकाच्या शेवटच्या चार चेंडूवर रसेलने सलग षटकार खेचले, त्यानंतर आठव्या षटकात फिरकीपटू जॉन-रस जॅग्गेसरच्या दोन चेंडूवर सलग षटकार खेचले. सिकुगे प्रसनाने ५ चेंडूंत १९ धावा करून हातभा लावला.   प्रत्युत्तरात पॅट्रिओट्सना ४ बाद १५२ धावा करता आल्या. आंद्रे फ्लेचरने १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांची खेळी केली. ख्रिस गेल १६ चेंडूंत १९ धावा करून माघारी परतला. पण, शेरफाने रुथरफोर्ड व डॉमिनिक ड्रॅक्स यांनी दमदार फटकेबाजी केली. रुथरफोर्डने १५ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. डॉमिनिकने १० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३३ धावा केल्या, परंतु विजयासाठी चार धावा कमी पडल्या. अँडरसन फिलिपने ३ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सटी-10 लीग
Open in App