Join us

Radhika Merchant-Anant Ambani: पाकिस्तान सुपर लीग सोडून 'मुंबई'च्या शिलेदारानं गाठलं जामनगर

Anant Radhika Wedding Photos: क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे पोहोचत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:45 IST

Open in App

Anant Ambani And Radhika Merchant | जामनगर: सध्या गुजरातमधील जामनगर येथे सेलिब्रिटींचा मेळावा भरला आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी सध्या गुजरातमधील जामनगर येथे पोहोचत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी हजेरी लावली. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी भारतात पोहोचला आहे. 

खरं तर पोलार्ड एक दिवसापूर्वीपर्यंत पाकिस्तानातील कराचीमध्ये होता. तो पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये कराची किंग्जकडून खेळत आहे. २९ फेब्रुवारीला कराची किंग्जचा क्वेटा ग्लॅडिएटर्सशी सामना होता. या सामन्यानंतर तो १ मार्च रोजी सायंकाळी उशिरा गुजरातमधील जामनगरला पोहोचला. आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीचा भाग आहे. तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी मुंबईच्या शिलेदारांना मार्गदर्शन करण्याचे काम करतो. 

१ मार्च ते ३ मार्चपर्यंत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे सर्व मोठे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.

राधिका मर्चंट ही अनंत अंबानी यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला. ती उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. यापूर्वी राधिका अंबानी कुटुंबाच्या अनेक फंक्शन्समध्ये झळकली आहे. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला होता, त्यानंतर आता जामनगरमध्ये प्री-वेडिंग आणि लग्न मुंबईत होणार आहे. 

टॅग्स :किरॉन पोलार्डपाकिस्तानमुकेश अंबानीगुजरातऑफ द फिल्ड