जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ ऐतिहासिक इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होण्यास सज्ज झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे मागील अडीच महिन्यांपासून क्रिकेट स्पर्धांना ब्रेक लागला होता. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे. या मालिकेला जाण्यापूर्वी विंडीजच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी मँचेस्टर येथे दाखल होणार आहे. त्यानंतर जैव-सुरक्षित वातावरणात हे खेळाडू राहणार असून त्यानंतर तीन आठवडे सराव करणार आहेत. 8 जुलैपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात 8, 16 आणि 24 जुलैला क्रिकेट सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी विंडीजनं 14 सदस्यीय संघ जाहीर केला. डॅरेन ब्राव्हो, किमो पॉल आणि शिमरोन हेटमायर यांनी इंग्लंड दौऱ्यावर येण्यास नकार दिल्याचे विंडीज बोर्डानं सांगितले. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखील विंडीज संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय