इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५

पावसामुळे प्रभावित पहिले दोन दिवस विंडीजच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 05:01 AM2020-07-11T05:01:32+5:302020-07-11T05:02:05+5:30

whatsapp join usJoin us
West Indies Leading against England, Braithwaite's half-century | इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५

इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी चहापानापर्यंत वेस्ट इंडिजने ५ बाद २३५ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०४ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३१ धावांची आघाडी घेतली होती व त्यांच्या ५ विकेट शिल्लक होत्या.

त्याआधी, १ बाद ५७ धावसंख्येवरून खेळताना विंडीजने शाई होप (१६) व क्रेग ब्रेथवेट (६५) यांना गमावले. विंडीजने शुक्रवारी पहिल्या सत्रात १२२ धावा केल्या. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी शामार ब्रुक्स (२७) व रोस्टन चेस (१३) खेळपट्टीवर होते. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना पहिल्या सत्रात विशेष छाप सोडता आली नाही. पावसामुळे प्रभावित पहिले दोन दिवस विंडीजच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. जोफ्रा आर्चर व मार्क वुड यांना अद्याप बळी घेता आला नाही. फिरकीपटू डोम बेसने आपल्या पहिल्याच षटकात पहिले यश मिळवले. त्याच्या गोलंदाजीवर होपचा उडालेला झेल स्लिपमध्ये बेन स्टोक्सने टिपला.

त्याआधी तो आर्चरच्या गोलंदाजीवर सुदैवी ठरला. होपला पंचांनी पायचितच्या अपीलवर बाद दिले होते, पण रिव्ह्यूमध्ये तो चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले. स्टोक्सने ब्रेथवेटला पायचित केले. त्याने १२५ चेंडूंत ६ चौकारांसह ६५ धावा केल्या. पंचांनी बाद दिल्यानंतर विंडीजने रिव्ह्यू घेतला, पण डीआरएसमध्येही मैदानावरील पंचाचा निर्णय कायम राहिला.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ६७.३ षटकात सर्वबाद २०४ धावा (रोरी बर्न्स ३०, ज्यो डेन्ली १८, क्राऊले १०, ओली पोप १२, बेन स्टोक्स ४३, जोस बटलर ३५, डोम बेस नाबाद ३१, जेम्स अ‍ॅन्डरसन १० ), गोलंदाजी : शॅनन गॅब्रियल १५.३/३/६२/४, होल्डर २०/६/४२/६. वेस्ट इंडिज (पहिला डाव) ७१ षटकांत ५ बाद २३५ (बे्रथवेट ६५, जॉन कॅम्पबेल २८, शाई होप्स १६, शामार ब्रुक्स ३९, रोस्टन चेस नाबाद ३५. गोलंदाजी : (अँडरसन २-४२, बेन स्टोक्स १-२०, डोमनिक बेस २-४०)

चेंडूला चकाकीसाठी घामाचा वापर-मार्क वूड

कोरोनामुळे चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा उपयोग करण्यावर आयसीसीने बंदी आणली आहे.अशावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लिश गोलंदाज पाठीच्या घामाचा उपयोग करीत असल्याची माहिती वेगवान गोलंदाज मार्क वूड याने दिली.दुसºया दिवशी खेळ संपल्यानंतर वूड म्हणाला,‘लाळेला पर्याय म्हणून पाठीचा घाम उपयुक्त ठरत आहे. सहकारी खेळाडू चेंडूवर आपापला घाम लावत आहेत.’ दोन दिवसाच्या खेळात विंडीजविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात अपयश आल्याची कबुली वूड याने दिली. तो म्हणाला,‘आम्हाला ३०० धावा काढायला हव्या होत्या. विंडीजने संतुलित मारा करीत आम्हाला रोखले. आता त्यांच्या फलंदाजांना लवकर बाद करण्याचे आमच्यापुढे आव्हान आहे.

Web Title: West Indies Leading against England, Braithwaite's half-century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.