सेंट जोन्स : वेस्ट इडिज क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौºयास मंजुरी प्रदान केली असून जैव सुरक्षा वातावरणात तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. हीि मालिका आधी जूनमध्ये होणार होती, मात्र कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली. आता उभय संघ जुलैमध्ये कसोटी मालिका खेळतील.क्रिकेट वेस्ट इंडिजने दिलेल्या वृत्तानुसार सीडब्ल्यूआयने कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करण्यास मंजुरी प्रदान केली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड, सीडब्ल्यू आयचे वैद्यकीय पथक यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खेळाडू आणि स्टाफला इंग्लंडमध्ये कसे ठेवायचे याची संपूर्ण योजना सोपविण्यात आली. या योजनेचा आढावा घेतल्यानंतर दौºयास हिरवा झेंडा दाखवला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जैव सुरक्षा वातावरणात वास्तव्य करेल, शिवाय सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविले जातील. ईसीबीने ८, १६ तसेच २४ जुलै रोजी कसोटी सामने सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. हॅम्पशायर आणि ओल्ड टॅÑफोर्ड मैदानावर सामने खेळविले जातील. (वृत्तसंस्था)विंडीजचे खेळाडू, कर्मचाऱ्यांची वेतनकपातसेंट जोन्स : क्रिकेट वेस्ट इंडिजने कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी क्रिकेटपटू आणि कर्मचाºयांचे ५० टक्के वेतन अस्थायी स्वरूपात कमी करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय वित्त समितीच्या शिफारशीनंतर सीडब्ल्यूआय संचालक बोर्डाने टेलि कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.सध्या आंतरराष्टÑीय क्रिकेट स्थगित असून क्रिकेट नियमितपणे कधी सुरू होईल, याविषयी खात्री नाही. उत्पन्न नसल्यामुळे अस्थायीरीत्या वेतनकपात अनिवार्य झाली आहे. सर्व कर्मचाºयांच्या नोकºया मात्र सुरक्षित असल्याची हमी बोर्डाने दिली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विंडीजची सुरक्षित वातावरणात इंग्लंड दौऱ्यास मंजुरी
विंडीजची सुरक्षित वातावरणात इंग्लंड दौऱ्यास मंजुरी
क्रिकेट वेस्ट इंडिजने दिलेल्या वृत्तानुसार सीडब्ल्यूआयने कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करण्यास मंजुरी प्रदान केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 4:29 AM