गुरुवारपासून भारत पुन्हा कसोटी प्रकाराकडे वळणार आहे. यंदा लढत घरच्या मैदानावर असून प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज आहे. कॅरेबियन संघ पुनर्बांधणीतून जातो आहे. अशावेळी भारताविरुद्ध खेळणे माऊंट एव्हरेस्ट चढण्यापेक्षा कमी नाही. ‘जेसन होल्डर अॅन्ड कंपनी’ला विराटच्या संघाविरुद्ध कठोर संघर्ष करावा लागेल.गेल्या काही महिन्यांपासून विंडीजने चांगला खेळ केला आहे, पण भारतात परिस्थिती वेगळी असते. पाहुण्या गोलंदाजांना बळी घेणारा मारा करावा लागेल. फलंदाजांना भारतीय फिरकीपुढे संयमी वृत्ती दाखविण्याचे आव्हान असेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील परिस्थितीशी एकरुप होण्यासाठी मनोबल उंच ठेवावे लागणार आहे.राजकोटच्या खेळपट्टीवर गवत दिसले. पाहुण्या संघाला यामुळे समाधान वाटले असावे. क्रेग ब्रेथवेट, शाय होप, रोस्टन चेज ,कीरोन पॉवेल , शेन डाूरिच यांना भारतीय गोलंदाजी खेळून काढण्याचे आव्हान असेल. अश्विन- जडेजा यांच्या फिरकीला ते कसे खेळतात, उमेश - शमी यांचा वेगवान मारा कसे चुकवितात यावर विंडीजचे यश विसंबून असेल. हा संघ पहिल्या सामन्यात केमर रोचच्या अनुभवास मुकणार आहे.भारत आॅस्ट्रेलिया दौºयावर जाण्याआधी दोन कसोटी सामने खेळत आहे. यात अनेक युवा खेळाडूंची प्रतिभा तपासता येईल. पृथ्वी शॉ स्थानिक कामगिरीच्या बळावरसंघात आला. पुजारा, रहाणे यासारख्या सिनियर्सना पुन्हा प्रतिभा सिद्ध करण्याची संधी राहील. विश्रांतीनंतर कोहली ताजातवाना होऊन परतला. आॅस्ट्रेलिया दौºयाआधी संघातील उणिवा दूर करण्याची कर्णधार म्हणून त्याच्याकडे संधी आहे. याशिवाय सलामी जोडीला स्थायित्व प्रदान करण्याची हीच वेळ आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विंडीजविरुद्धची मालिका भारतासाठी ‘वॉर्मअप’ ठरणार'
'आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विंडीजविरुद्धची मालिका भारतासाठी ‘वॉर्मअप’ ठरणार'
सौरव गांगुली लिहितात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 7:01 AM