Ind vs Wi : वेस्ट इंडिजचा संघ सरावाला लागला; भारताचे खेळाडू करतायत तरी काय...

वेस्ट इंडिजचा संघ या मालिकेकडे गंभीरपणे पाहतो आहे. पण दुसरीकडे भारताचे खेळाडू करतायत तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 06:38 PM2019-12-03T18:38:55+5:302019-12-03T18:40:16+5:30

whatsapp join usJoin us
West Indies squad begins to practice; What Indian players are doing | Ind vs Wi : वेस्ट इंडिजचा संघ सरावाला लागला; भारताचे खेळाडू करतायत तरी काय...

Ind vs Wi : वेस्ट इंडिजचा संघ सरावाला लागला; भारताचे खेळाडू करतायत तरी काय...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाने सराव करायला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजचा संघ या मालिकेकडे गंभीरपणे पाहतो आहे. पण दुसरीकडे भारताचे खेळाडू करतायत तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं आपला संघ आधीच जाहीर केला. वेस्ट इंडिजनं सॉलिड संघ मैदानावर उतरवला. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघाची घोषणा केली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजनं हा संघ जाहीर केला आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी किरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पोलार्डसह ट्वेंटी-20 संघात शेरफन रुथरफोर्ड आमि जेसन होल्डर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

पाहुण्यांनी दमदार फलंदाजांची फौजच या मालिकेला पाठवली आहे. यात एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, लेंडल सिमन्स, पोलार्ड आणि निकोलस पूरण यांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे शेल्डन कोट्रेल, होल्डर, किमो पॉल आणि केस्रीक विलियम्स यांचा समावेश आहे. 

Image

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

Image

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स.


विंडीज मालिकेचे वेळापत्रक
⦁    ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - हैदराबाद
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - मुंबई 
⦁    वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक 
 

Web Title: West Indies squad begins to practice; What Indian players are doing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.