West Indies Squad for India : टीम इंडियाचा खेळ पाहून विंडीजला फुटलाय घाम, अनुभवी अष्टपैलू खेळाडूला पुन्हा वन डे संघात बोलावले 

India Tour of West Indies : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप विजेत्या संघाची जी अवस्था केली, ती पाहून वेस्ट इंडिज संघाने धास्ती घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:48 AM2022-07-18T10:48:38+5:302022-07-18T10:49:20+5:30

whatsapp join usJoin us
West Indies Squad for India : Jason Holder will be making his comeback in the ODI series against India. West Indies name strong 13-member squad   | West Indies Squad for India : टीम इंडियाचा खेळ पाहून विंडीजला फुटलाय घाम, अनुभवी अष्टपैलू खेळाडूला पुन्हा वन डे संघात बोलावले 

West Indies Squad for India : टीम इंडियाचा खेळ पाहून विंडीजला फुटलाय घाम, अनुभवी अष्टपैलू खेळाडूला पुन्हा वन डे संघात बोलावले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of West Indies : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप विजेत्या संघाची जी अवस्था केली, ती पाहून वेस्ट इंडिज संघाने धास्ती घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत घरच्या मैदानावर सपाटून मार खाणाऱ्या विंडीजने टीम इंडियाविरुद्ध तगडा संघ मैदानावर उतरवला आहे. भारतीय खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेता विंडीजने वन डे मालिकेसाठी १३ सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यात त्यांनी ६ फूट उंचीच्या अनुभवी अष्टपैलू खेळाडूला संघात पुन्हा बोलावले आहे. क्रिकेट विंडीजने २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आणि त्यात त्यांनी अनुभवी जेसन होल्डरला ( Jason Holder) पुन्हा बोलावले आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत तो खेळला नव्हता. 
 

''जेसन होल्डर हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूपैकी एक आहे आणि त्याच्या पुनरागमनाचा आम्हाला आनंद आहे. विश्रांती घेतल्यामुळे तो ताजातवाना झाला आहे आणि भारताच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे,''असे क्रिकेट विंडीजने सांगितले.   


वेस्ट इंडिजचा वन डे संघ - निकोलस पूरन ( कर्णधार) शे होप, शॅमर्ह ब्रुक्स, किसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, कायले मेयर्स, गुदाकेश मोटी, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स ( West Indies squad: Nicholas Pooran (captain), Shai Hope, Shamarh Brooks, Keacy Carty, Jason Holder, Akeal Hosein, Alzarri Joseph, Brandon King, Kyle Mayers, Gudakesh Motie, Keemo Paul, Rovman Powell, Jayden Seales) 

भारताचा वन डे संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग. 

वेस्टइंडिज दौऱ्याचे वेळापत्रक

वन डे मालिका-
२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)

ट्वेंटी-२० मालिका- 
२९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन
१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)

Web Title: West Indies Squad for India : Jason Holder will be making his comeback in the ODI series against India. West Indies name strong 13-member squad  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.