India Tour of West Indies : भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप विजेत्या संघाची जी अवस्था केली, ती पाहून वेस्ट इंडिज संघाने धास्ती घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत घरच्या मैदानावर सपाटून मार खाणाऱ्या विंडीजने टीम इंडियाविरुद्ध तगडा संघ मैदानावर उतरवला आहे. भारतीय खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेता विंडीजने वन डे मालिकेसाठी १३ सदस्यीय संघ जाहीर केला आणि त्यात त्यांनी ६ फूट उंचीच्या अनुभवी अष्टपैलू खेळाडूला संघात पुन्हा बोलावले आहे. क्रिकेट विंडीजने २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आणि त्यात त्यांनी अनुभवी जेसन होल्डरला ( Jason Holder) पुन्हा बोलावले आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत तो खेळला नव्हता.
''जेसन होल्डर हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूपैकी एक आहे आणि त्याच्या पुनरागमनाचा आम्हाला आनंद आहे. विश्रांती घेतल्यामुळे तो ताजातवाना झाला आहे आणि भारताच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे,''असे क्रिकेट विंडीजने सांगितले.
भारताचा वन डे संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
वेस्टइंडिज दौऱ्याचे वेळापत्रक
वन डे मालिका-२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
ट्वेंटी-२० मालिका- २९ जुलै - पहिला ट्वेंटी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरा ट्वेंटी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवा ट्वेंटी-२० सामना - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)