दक्षिण आफ्रिकेत या वर्षी पार पडलेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या किमानी मेलिअसनं टी10 लीगमध्ये धडाकेबाज खेळी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत विंडीजला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि त्यात किमानी हा विंडीजकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. वर्ल्ड कप स्पर्धेतील कामिगरीनंतर किमानीनं लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज ब संघाकडून पदार्पण केले आणि 46 धावांची खेळी केली. आता सेंट ल्यूसिया टी 10 लीगमध्ये किमानीनं आपली छाप पाडली आहे.
कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली नसली तरी कॅरेबियन बेटांवर सेंट ल्यूसिया टी 10 लीग सुरू झाली आहे. 8 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण, सेंट ल्यूसिया टी 10 लीगमध्ये 19 वर्षीय खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधले आहे. सेंट ल्यूसिया टी 10 लीगमध्ये ग्रॉस इसलेट कॅनन ब्लास्ट आणि वियक्स फॉर्ट नॉर्थ रेडर्स यांच्यात सामना झाला. किमानीनं या सामन्यात ग्रॉस इसलेट संघाचे प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली.
त्यानं 34 चेंडूंत 103धावा करताना चार चौकार व 11 षटकार खेचले. त्यानं सलामीला टॅरीक गॅब्रियसह 166 धावांची भागीदारी केली. गॅब्रियलनं 50 धावा केल्या. ग्रॉस इसलेटनं प्रथम फलंदीज करताना 10 षटकांत 166 धावांचा डोंगर उभा केला. किमानीनं अखेरच्या षटकात सलग पाच षटकार खेचले आणि अखेरच्या चेंडूवर त्याला चौकार मारता आला. प्रत्युत्तरात वियक्स फॉर्ट नॉर्थ रेडर्स संघाला 5 बाद 103 धावाच करता आल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video
मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा
आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला