Ind vs Wi Live : भारताची दमदार फलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८

Ind vs WI Live - वेस्ट इंडिजने दिलेल्या 311 धावांचे लक्ष्य घेऊन टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:29 AM2018-10-13T10:29:57+5:302018-10-13T17:02:33+5:30

whatsapp join usJoin us
West Indies were bowled out for 311 in their first innings, India batting started today | Ind vs Wi Live : भारताची दमदार फलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८

Ind vs Wi Live : भारताची दमदार फलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारत विरुद्द वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 311 धावांपर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजचा शेवटचा फलंदाज शनॉन गॅब्रील 101.4 षटकात बाद झाला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर पंतने शनॉनचा झेल घेतला. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने 106 धावांचा शतकी खेळ केला तर भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 6 गडी बाद केले. 

Live Update - 

भारताची दमदार फलंदाजी, दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३०८



 

डबल धमाका... अजिंक्य आणि रिषभ यांची अर्धशतके



 

कर्णधार विराट कोहलीच्या रुपाने भारताला चौथा झटका बसला आहे. विराटने 78 चेंडूत 45 धावा करत भारताचा डाव सावरला होता. मात्र, होल्डरच्या गोलंदाजीवर विराट पायचीत बाद झाला. त्यावेळी टीम इंडियाच्या 162 धावा फलकावर होत्या. 



 

भारताला तिसरा झटका बसला असून गॅब्रेलच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराही 10 धावा काढून बाद झाला आहे. चेतेश्वरनंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला असून विराट आणि अजिंक्य ही जोडी भारताचा डाव सावरत आहे.

पृथ्वीच्या रुपाने भारताला दुसरा धक्का  बसला आहे. धडाकेबाजी फलंदाजी करुन पृथ्वी 70 धावांवर बाद झाला. त्याने 53 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 70 धावा केल्या. मात्र, भारताची धावसंख्या 98 असताना तो बाद झाला.  त्यामुळे भारत 20 व्या षटकात 2 बाद 100 पर्यंत पोहोचला आहे. 

भारताने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. त्यातच पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 40 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर, लोकेश राहुल केवळ 4 धावांवर बाद झाला. मात्र, पृथ्वीच्या सुरेख खेळामुळे भारत दमदार स्थितीत पोहोचला आहे. लोकेशनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला आहे.  



 

भारताकडून लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी धमाकेदार सुरूवात केली आहे. त्यामुळे पहिल्या 7 षटकातच टीम इंडियाचे अर्धशतक फलकावर झळकले. त्यामध्ये पृथ्वी शॉने तडाखेबंद फलंदाजी करत 24 चेंडूत 30 धावा केल्या.

 

वेस्ट इंडिजने दिलेल्या 311 धावांचे लक्ष्य घेऊन टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. सलामीला लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी फलंदाजीला सुरुवात केली असून दोघांचाही संयमी खेळ सुरू आहे.



 

Web Title: West Indies were bowled out for 311 in their first innings, India batting started today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.