Join us  

वेस्ट इंडिज दुबळ्या संघाविरुद्ध खेळणार

दोन वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला वेस्ट इंडिजचा संघ २0१९ मध्ये होणाºया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपले स्थान पक्के करण्यासाठी उद्यापासून होणाºया पात्रता फेरी लढतीत खेळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:49 AM

Open in App

हरारे : दोन वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला वेस्ट इंडिजचा संघ २0१९ मध्ये होणाºया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपले स्थान पक्के करण्यासाठी उद्यापासून होणाºया पात्रता फेरी लढतीत खेळेल.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील विश्वचषकासाठी दहा संघ मर्यादित ठेवण्याच्या घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाचा सर्वात मोठा फटका १९७५ आणि १९७९ साली चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजला बसला आहे.विश्वचषक २00७ मध्ये १६ संघांनी सहभाग घेतला होता, तर २0११ आणि २0१५ मध्ये १४ संघ खेळले होते. क्रिकेटमधील आर्थिक महाशक्ती ठरणारा भारत २00७ च्या विश्वचषकातील तीन सामन्यांनंतर स्पर्धेतून बाद झाला होता. त्यामुळे त्या वेळेस आयसीसीला खूप नुकसान सोसावे लागले होते.आता २0१९ आणि २0२३ मधील नव्या स्वरूपानुसार संघांना कमीत कमी ९ सामने खेळण्यास मिळणार आहेत. वेस्ट इंडिजचा संघ टॉप टेनमध्ये नसल्यामुळे त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागत आहे. ही स्पर्धा २५ मार्चपर्यंत चालणार आहे.त्यात त्यांची लढत अफगाणिस्तान, आयर्लंड, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग, पापुआ न्यू गिनिया, नेदरलँड, यूएई आणि नेपाळशी होईल.