दुबई : विश्वकप २०१९ च्या उर्वरित दोन स्थानांसाठी १० संघांदरम्यान मार्चमध्ये होणा-या आयसीसी विश्वकप पात्रता स्पर्धेत दोनदा विश्वविजेतेपद पटकावणारा वेस्ट इंडिज संघ आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. पात्रता स्पर्धा ४ ते २५ मार्च या कालावधीत झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणार आहे.
वेस्ट इंडिजव्यतिरिक्त अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघांना ३० सप्टेंबर २०१७ च्या निर्धारित कालावधीपर्यंत आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे विश्वकप २०१९ साठी त्यांना थेट पात्रता मिळवता आली नाही.
या चार संघांव्यतिरिक्त आयसीसी विश्व क्रिकेट लीगमध्ये अव्वल चार स्थानावरील हाँगकाँग, नेदरलंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनिया पात्रता स्पर्धेत सहभागी होणार आहेत. उर्वरित दोन संघांबाबतचा निर्णय नामिबियामध्ये ८ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होणाºया आयसीसी विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन दोन स्पर्धेनंतर होईल. त्यात कॅनडा, किनिया, नामिबिया, नेपाळ, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात सहभागी होत आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वकप पात्रता स्पर्धेत सहभागी संघांची पाच-पाच संघांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज, आयर्लंड, नेदरलँड, पापुआ न्यूगिनी आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन दोनचा विजेता संघ ‘अ’ गटात तर अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग आणि आयसीसी क्रिकेट विश्व लीग डिव्हिजन दोनचा उपविजेता संघ ‘ब’ गटात आहे.
गटातील प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळावे लागणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरतील. गटसाखळीत एकमेकांविरुद्ध न खेळणारे संघ सुपर सिक्समध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. अंतिम फेरी गाठणारे संघ विश्वकप स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
Web Title: The West Indies will play along with nine other teams to qualify for the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.