West Indies wrap up 4-1 T20I series win over Australia : वेस्ट इंडिज संघानं पाचव्या ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियवर १६ धावांनी विजय मिळवताना मालिका ४-१ अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियानं चौथा सामना जिंकून कमबॅक केले, परंतु पाचव्या सामन्यात एव्हिन लुईससह विंडीजच्या अन्य फलंदाजांनी कागारूंचा पालापाचोळा केला. वेस्ट इंडिजच्या ८ बाद १९९ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला ९ बाद १८३ धावा करता आल्या. फॅबियन अॅलननं ऑसी कर्णधार आरोन फिंचला अफलातून झेल घेत विंडीजला मोठं यश मिळवून दिलं. त्यानंतर ऑसी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात आहेत. आयसीसीनं शुक्रवारी गटवारी जाहीर केली अन् रात्री विंडीजनं कागारूंची धुलाई केली. आंद्रे फ्लेचर १२ धावांवर माघारी परतल्यानंतर लुईस आणि गेलनं फटकेबाजी केली. गेलनं ७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३००च्या स्ट्राईक रेटनं २१ धावा केल्या. लेंडन सिमन्स २१ धावांवर माघारी परतला, तर कर्णधार निकोलस पूरननं १८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. लुईसनं ३४ चेंडूंत ७९ धावा कुटल्या. यापैकी ७० धावा या फक्त १३ चेंडूंत ( ४ चौकार व ९ षटकार) आल्या. विंडीजनं ८ बाद १९९ धावा केल्या. अँड्य्रू टायनं तीन, तर मिचेल मार्श व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. जोश फिलिप शून्यावर बाद झाला. आरोन फिंच व मिचेल मार्श चांगल्या फॉर्मात दिसत होते, परंतु फॅबियन अॅलननं फिंचचा सुरेख झेल टिपला. फिंच ३४ आणि मार्श ३० धावांत माघारी परतले. शेल्डन कोट्रेल आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के दिले. ऑस्ट्रेलियाला ९ बाद १८३ धावाच करता आल्या.
Web Title: West Indies wrap up 4-1 T20I series win over Australia, Evin Lewis stars as windies won 5th match by 16 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.