AUS vs SA Test : खाया झोंडोचा अफलातून झेल, डेव्हिड वॉर्नर ठरला फेल! कागिसो रबाडाच्या भन्नाट चेंडूवर बाद, Video

Australia vs South Africa 1st Test : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची कसोटी मालिका सुरू झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 11:45 AM2022-12-17T11:45:19+5:302022-12-17T11:47:06+5:30

whatsapp join usJoin us
What a ball & What a catch by Khaya Zondo : South Africa bowled out for just 152 against Australia, but David Warner fends Kagiso Rabada away to short leg FIRST BALL of the innings | AUS vs SA Test : खाया झोंडोचा अफलातून झेल, डेव्हिड वॉर्नर ठरला फेल! कागिसो रबाडाच्या भन्नाट चेंडूवर बाद, Video

AUS vs SA Test : खाया झोंडोचा अफलातून झेल, डेव्हिड वॉर्नर ठरला फेल! कागिसो रबाडाच्या भन्नाट चेंडूवर बाद, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia vs South Africa 1st Test : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची कसोटी मालिका सुरू झाली. वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करत आहे. ऑसी गोलंदाजांनी कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाहुण्या आफ्रिकेचा पहिला डाव १५२ धावांवर गुंडाळला. पण, आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही पलटवार केला. कागिसो रबाडाने डावातील पहिलाच चेंडू एवढा वेगवान टाकला की सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) काहीच करू शकला नाही. त्यात शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खाया झोंडो ( Khaya Zondo) याने अफलातून झेल घेतला.

आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( ३) आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ५) यांना मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी माघारी पाठवले. सारेल एर्वी ( १०), खाया झोंडो ( ०) हेही अपयशी ठरले. टेम्बा बवुमा व कायले व्हेरेयने यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीसमोर तेही अपयशी ठरले. बवुमा ३८, तर व्हेरेयने ६४ धावांवर बाद झाला. उरलेली कसर नॅथन लियॉनने भरून काढली. त्याने तीन विकेट्स घेतल्या. स्टार्सनेही तीन, तर कमिन्स व बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


प्रत्युत्तरात ऑसींनाही धक्के बसले आहेत. कागिसो रबाडाने पहिलाच चेंडू वेगवान अने उसळी घेणारा टाकला अन् वॉर्नर चाचपडला. त्याच्या बॅटवर चेंडू आदळून शॉर्ट लेगच्या दिशेने उडाला अन्  झोंडोने हवेत झेपावत एका हाताने भन्नाट झेल टिपला. २०१३नंतर वॉर्नर कसोटीत प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला. उस्मान ख्वाजा ( ११) व मार्नस लाबुशेन ( ११) यांना अनुक्रमे एनरिच नॉर्खिया व मार्को येनसन यांनी बाद केले आणि ऑसींचे तीन फलंदाज २७ धावांवर माघारी पाठवले. 



सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

Web Title: What a ball & What a catch by Khaya Zondo : South Africa bowled out for just 152 against Australia, but David Warner fends Kagiso Rabada away to short leg FIRST BALL of the innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.