Australia vs South Africa 1st Test : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची कसोटी मालिका सुरू झाली. वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करत आहे. ऑसी गोलंदाजांनी कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाहुण्या आफ्रिकेचा पहिला डाव १५२ धावांवर गुंडाळला. पण, आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही पलटवार केला. कागिसो रबाडाने डावातील पहिलाच चेंडू एवढा वेगवान टाकला की सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) काहीच करू शकला नाही. त्यात शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या खाया झोंडो ( Khaya Zondo) याने अफलातून झेल घेतला.
आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( ३) आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ५) यांना मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी माघारी पाठवले. सारेल एर्वी ( १०), खाया झोंडो ( ०) हेही अपयशी ठरले. टेम्बा बवुमा व कायले व्हेरेयने यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु स्कॉट बोलंडच्या गोलंदाजीसमोर तेही अपयशी ठरले. बवुमा ३८, तर व्हेरेयने ६४ धावांवर बाद झाला. उरलेली कसर नॅथन लियॉनने भरून काढली. त्याने तीन विकेट्स घेतल्या. स्टार्सनेही तीन, तर कमिन्स व बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"