मुंबई : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आड झंझावाती त्रिशतक झळकावले. या त्रिशतकानंतर वॉर्नरने जोरदार सेलिब्रेशन केले. त्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला, तेव्हा एका लहानग्याने वॉर्नरला रोखले, त्यावेळी वॉर्नरने जे कृत्य केले ते एका व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच वायर होताना दिसत आहे.
वॉर्नरने या सामन्यात नाबाद ३३५ धावांची खेळी साकारली. या खेळीनंतर वॉर्नर जेव्हा पेव्हेलियनमध्ये परतत होता तेव्हा त्याला एका लहानग्या चाहत्याने थांबवले. त्यानंतर वॉर्नरने त्याच्याबरोबर एक कृती केल्याचे पाहायला मिळाले.
पेव्हेलियनमध्ये पोहोचण्यापूर्वी हा लहानगा प्रेक्षकांमध्ये बसला होता. त्याला वॉर्नरला हात मिळवायचा होता आणि शुभेच्छा द्यायच्या होत्या. या लहानग्याने वॉर्नरला हाक मारली. त्यावेळी वॉर्नर त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार तर केलाच, पण या त्रिशतकाच्यावेळी वापरलेले हॅल्मेट त्याला भेट म्हणून दिले.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने २९६ धावांवर असताना चौकार वसूल केला आणि त्रिशतक पूर्ण केले. त्रिशतक पूर्ण केल्यावर वॉर्नरने मैदानात एकच जल्लोश केला. चाहत्यांनीही वॉर्नरला मानवंदना दिली, पण यावेळी वॉर्नरची पत्नी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिने भावुक झाल्यावर एक कृत्य केले आणि त्याा फोटो चांगलाच वायरल झाल्याचे म्हटले जात आहे.
वॉर्नरने त्रिशतक झळकावल्यावर धावतच आपले सेलिब्रेशन सुरु केले. पाकिस्तानच्या खेळाडूंसह चाहत्यांनीही त्याचे कौतुक केले. हा सामना पाहायला त्याची पत्नी कँडीसही आली होती. त्याने शतक झळकावल्यावर कँडिसच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला सुरुवात झाली. आपल्या आनंदाश्रूंना तिला रोखता येत नव्हते.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावत इतिहास रचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वॉर्नरने शतक पूर्ण केले होते. पण दुसऱ्या दिवशी द्विशतकासह त्याने त्रिशतकही पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून दिवस रात्र कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणारा वॉर्नर हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. वॉर्नरने ३८९ चेंडूंत ३७ चौकारांसह आपले त्रिशतक पूर्ण केले.
वॉर्नरच्या त्रिशतकामुळे विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम नोंदवताना ऑस्ट्रेलियाने भारताला पिछाडीवर टाकले आहे. ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या त्रिशतकाच्या जोरावर ५९८ धावा केल्या, यामध्ये वॉर्नरच्या नाबाद ३३५ धावांचा सिंहाचा वाटा होता.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटी ( दिवस रात्र) सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांची धू धू धुलाई केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुश्चॅग्ने यांनी शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. जो बर्न्स ( 4) स्वस्तात माघारी परतल्यानंतर वॉर्नर आणि लॅबुस्चॅग्ने या जोडीनं ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 250+ धावांची भागीदारी केली. या सामन्यात पाकिस्ताच्या खेळाडूंचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि त्याचाच फायदा ऑसी फलंदाजांना झाला. ऑस्ट्रेलियानं 66 षटकांत 1 बाद 269 धावा केल्या होत्या.
पहिल्या कसोटीत पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं 296 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 154 धावा कुटल्या. मार्नस लॅबुश्चॅग्नेनं कसोटीतील पहिले शतक झळकावताना 185 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 580 धावांपर्यंत मजल मारून दिली. पाकिस्तानचा दुसरा डाव 335 धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. हेझलवूड ( 4/63), मिचेल स्टार्क ( 3/73) आणि पॅट कमिन्स ( 2/69) यांनी पाकचा धाव गुंडाळला. पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या कसोटीतही वॉर्नर आणि लॅबुश्चॅग्ने या जोडीनं पाकिस्तानच्या फलंदाजांवर प्रहार केला. वॉर्नर 206 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीनं 140 धावांवर खेळत आहे, तर लॅबुश्चॅग्ने 188 चेंडूंत 17 चौकारांसह 119 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचे हे पाचवे कसोटी शतक ठरले आणि सर्वात कमी डावांत म्हणजे 11 डावांमध्ये वॉर्नरनं ही कामगिरी केली. त्यानं राहुल द्रविडचा 17 डावांमध्ये 5 कसोटी शतकांचा विक्रम मोडला. 2012नंतर ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी कसोटीत सलग दोन शतक करण्याचा विक्रम केला. 2012मध्ये मायक्ले क्लार्क ( 259* व 230 ) आणि माइक हसी ( 100 व 103) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतकं झळकावली होती.
Web Title: What did david Warner do with the little boy on the field when he triple hundred; The video has gone viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.