मैदानात ज्याची गरज भासेल त्या सर्व गोष्टी मी सरावात पूर्ण करून घेतो आणि प्रत्यक्ष मैदानात सामना एन्जॉय करतो. तेव्हा मी चिंतेत नसतो. ना कोणता विचार करीत. जशी स्थिती असेल त्याला तुम्हाला विश्वासाने सामोरे जावे लागते. सामन्यात धावांमध्ये होणारी चढ-उतार आपल्याला धडा देते, की आयुष्यातही असेच चढ-उतार येत असतात. त्यामुळे क्षमतांवर विश्वास असायला हवा.
क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असे क्षण येतात की हा सामना हातून निसटतो असे वाटते. त्यामुळे अगदी थोड्या-थोड्या बाबींवर कसून सराव करणे महत्त्वाचे ठरते.
आज ज्या चार-सहा सेकंदाच्या कॅचच्या प्रसंगामुळे मी चर्चेत आहे. सर्व स्तरातून वर्ल्डकप विनिंग कॅचमुळे माझे कौतुक होत आहे. हे अचानक घडलले नाही तर त्यासाठी वर्षानुवर्षे अनेक मैदानांवर सराव केला आहे. त्याचेच हे फळ आहे.˘
आपण समर्थ
मैदानात असलो की लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात. जबाबदारी आणि दबावही असतो. पण हे सगळं पेलण्यासाठी आपण समर्थ आहोत हे विसरायला नको.
सांघिक प्रयत्न
बॅटींग तर मी करतोच पण त्याशिवाय संघात आणखी काय योगदान देऊ शकतो, याचा मी सातत्याने प्रयत्न करीत राहतो.
निवड होत नव्हती तेव्हा
टीम इंडियात माझी निवड होत नव्हती, तेव्हा मी विचार करायचो की, पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी मला आणखी काय करावे लागेल. त्यासाठी मी मेहनत करत राहिलो. मला विश्वास होता की माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केले तर संघात माझे स्थान पक्के असेल.
सर्व काही तुमच्या विरोधात असले तरीही स्वतःवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे.
(संकलन : महेश घोराळे)