नवी दिल्ली : सध्याच्या घडीला ज्वर चढायला सुरुवात झाला आहे तो विश्वचषकाचा. कारण आता विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे हा विश्वचषक कोण जिंकेल आणि कोणत्या कर्णधाराचा रोल महत्वाचा ठरेल, याद्दल चर्चा केली जात आहे. सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्या कॅप्टन्सीवर बऱ्याच चर्चा होत आहेत. या दोघांच्या कॅप्टन्सीमध्ये नेमका काय फरक आहे, हे दक्षिण आफ्रिकेचा माजी महान क्रिकेटपटू जाँटी रोड्सने सांगितले आहे.
भारताने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली होती. आता कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक जिंकणार का, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.
याबाबत जाँटी म्हणाला की, " धोनी आणि कोहली या दोघांचे स्वभाव भिन्न आहेत. त्यामुळे त्यांची नेतृत्वशैलीही वेगळी आहे. धोनी हा चांगली रणनीती आखतो. समोरच्या खेळाडूची मानसीकता ओळखतो. त्यानुसार तो आपल्या संघातील खेळाडूंकडून कामगिरी करून घेतो. पण दुसरीकडे कोहली हा आपल्या कामगिरीच्या जोरावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. कर्णधाराने स्वत: दमदार कामगिरी करून संघापुढे आदर्श निर्माण करावा, अशी कोहलीची शैली आहे."
प्रत्येक मालिकेच्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या सुचनांचा मला फायदा झाला, असे कुलदीप यादवने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील यशामध्ये धोनीने दिलेल्या सुचनांचा अमुल्य वाटा आहे, असे कुलदीपने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पण आज त्याने जो खुलासा केला त्यामुळे संघात कुणाची आणि कशी युती आहे, हे स्पष्ट झाले आहे.काही दिवसांपूर्वी भारताच्या काही माजी कर्णधारांनी धोनीच्या अनुभवाविषयी वक्तव्य केली होती. धोनीचा अनुभव हा संघातील युवा खेळाडूंसाठी फार मोलाचा ठरेल, असे या माजी क्रिकेटपटूंनी सांगितले होते. सुरुवातीला कुलदीपनेही, यापद्धतीचे वक्तव्य केले होते. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मी खेळणार होतो. त्यामुळे खेळपट्टी आणि वातावरण कसे असेल, याची मला कल्पना नव्हती. पण धोनीने मला योग्य मार्गदर्शन केले, असे म्हटले होते.