काय सांगता? चेन्नईने 2010 मध्येही पहिल्या सातपैकी पाच सामने गमावले होते

IPL 2020 CSK : तीन वेळचा हा माजी विजेता संघ एवढा कसा ढेपाळू शकतो असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:43 PM2020-10-11T12:43:19+5:302020-10-11T12:47:57+5:30

whatsapp join usJoin us
What do you say Chennai had also lost five of the first seven matches in 2010 | काय सांगता? चेन्नईने 2010 मध्येही पहिल्या सातपैकी पाच सामने गमावले होते

काय सांगता? चेन्नईने 2010 मध्येही पहिल्या सातपैकी पाच सामने गमावले होते

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-ललित झांबरे

आयपीएल 2020 (IPL 2020)  मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings)  पराभवांच्या मालिकेने सीएसके व्यवस्थापनासह क्रिकेटप्रेमी बुचकळ्यात आहेत. तीन वेळचा हा माजी विजेता संघ एवढा कसा ढेपाळू शकतो असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यांनी आपल्या पहिल्या सात पैकी पाच सामने गमावले आहेत. यामुळे त्यांच्या प्ले आॕफच्या आशा जवळपास मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे पण असे नाही आहे.

IPL 2020, MI vs DC: मुंबई-दिल्ली संघांदरम्यान चुरशीच्या लढतीची अपेक्षा; मुंबई इंडियन्सचे पारडे वरचढ

चेन्नई सुपर किंग्जच्या इतिहासात डोकावले तर दिसून येईल की, 2010 मध्येसुध्दा त्यांनी आपल्या पहिल्या सात सामन्यांपैकी पाच सामने गमावले होते. मात्र तरीसुध्दा त्यावर्षी ते विजेते ठरले होते. त्यामुळे सीएसकेसाठी सर्व काही संपलेय असे काही नाही. मात्र 2010 नंतरची त्यांची ही सर्वात खराब सुरुवात आहे हे मात्र नक्की. 

2010 च्या स्पर्धेत सीएसकेने साखळीचे 14 पैकी सात सामने जिंकले व सात गमावले होते आणि त्यांच्यापेक्षा अधिक विजय मुंबई इंडियन्स (10) व डेक्कन चार्जर्सच्या (8) नावावर होते पण शेवटी विजेतेपदाची ट्राॕफी चेन्नईनेच मुंबईला 22 धावांनी नमवून उंचावली होती. त्यामुळे धोनी आणि कंपनीला अजूनही संधी आहे असेच म्हणता येईल. 

 

सीएसकेचे पहिल्या सात सामन्यांतील पराभव

 

2008- 3

2009- 3

2010- 5

2011- 3

2012- 3

2013- 2

2014-1

2015- 1

2018- 2

2019- 1

2020- 5 

 

यंदाचे पहिले सात सामने

1) वि. मुंबई इंडियन्स - विजय

2) वि. राजस्थान राॕयल्स - पराभव

3) वि. दिल्ली - पराभव

4) वि. सनरायजर्स - पराभव

5) वि. पंजाब- विजय

6) वि. केकेआर - पराभव

7) वि. राॕयल चॕलेंजर्स- पराभव 

 

2010 मधील पहिले सात सामने

1) वि. डेक्कन चार्जर्स- पराभव

2) वि. नाईट रायडर्स-  विजय

3) वि. दिल्ली डेअरडेविल्स- विजय

4) वि. किंग्ज इलेव्हन- पराभव (सुपर ओव्हर) 

5) वि. राॕयल चॕलेंजर्स- पराभव

6) वि. मुंबई इंडियन्स- पराभव

7) वि. राजस्थान राॕयल्स- पराभव 

Web Title: What do you say Chennai had also lost five of the first seven matches in 2010

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.