IPL 2019 : खलील अहमदला 'phone call' सेलिब्रेशनमधून नेमकं काय सुचवायचंय? 

सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या 12व्या पर्वातील प्रवास एलिमिनेटर पर्यंत थांबला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:05 PM2019-05-09T17:05:35+5:302019-05-09T17:06:01+5:30

whatsapp join usJoin us
What does Khaleel Ahmed's 'phone call' celebration mean? Twitter tries to decode pacer's act | IPL 2019 : खलील अहमदला 'phone call' सेलिब्रेशनमधून नेमकं काय सुचवायचंय? 

IPL 2019 : खलील अहमदला 'phone call' सेलिब्रेशनमधून नेमकं काय सुचवायचंय? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या 12व्या पर्वातील प्रवास एलिमिनेटर पर्यंत थांबला. दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी झालेल्या सामन्यात दोन विकेट राखून हैदराबादला पराभूत केले. या सामन्यात हैदराबादचा गोलंदाज खलील अहमदने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने या सामन्यात पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर या दोन प्रमुख फलंदाजांना बाद केले. या सामन्यानंतर खलीलच्या सेलिब्रेशनचीच चर्चा अधिक रंगली. 'phone call' सेलिब्रेशन करून त्याला नक्की सुचवायचंय काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे आणि सोशल मीडियावरील चर्चांनी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. 


पृथ्वी शॉ आणि  रिषभ पंत यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हैदराबाद सनरायझर्सवर विजय मिळवला. पृथ्वीने 56 धावांची खेळी साकारत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर पंतने अखेरच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मार्टिन गप्तील, मनीष पांडे आणि केन विल्यम्सन यांच्या दमदार खेळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादलादिल्ली कॅपिटल्सपुढे 161धावांचे आव्हान ठेवता आले. दिल्लीकडून किमो पॉलने यावेळी तीन विकेट्स मिळवल्या. 


लक्ष्याचा पाठलाग करताना खलीलने दिल्लीचा कर्धार अय्यरला माघारी पाठवले आणि 'phone call' सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशन मागचं रहस्य त्याच्या सहकाऱ्यांनाही माहित नाही. मात्र, नेटिझन्सने त्याचं उत्तर शोधलं. असं सेलिब्रेशन करून खलील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार करा असे निवड समितीला सुचवतं आहे. असा शोध नेटिझन्सने लावला आहे. 










IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा!
हैदराबादच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये ३ चेंडूंत २ धावांची गरज होती. खलील अहमद गोलंदाजी करत होता आणि अमित मिश्रा स्ट्राईकवर होता. खलीलच्या चेंडूवर अमित मिश्रानं बॅट फिरवली, पण फटका चुकला आणि चेंडू यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या हाती गेला. अमित मिश्रा धावल्याचं पाहून साहानं त्याला रन-आउट करायचा प्रयत्न केला. परंतु, त्यानं फेकलेला चेंडू स्टम्पला न लागता गोलंदाज खलील अहमदकडे गेला. त्यानं झटक्यात चेंडू उचलून नॉन-स्ट्राईक एन्डवर अमित मिश्राला धावचित करायचा प्रयत्न केला. परंतु, खलीलनं फेकलेला चेंडू स्टम्पना लागणं तर सोडाच, पण त्या दिशेनं गेलाच नाही. स्वाभाविकच, मैदानावरील पंचांनी बाद देण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, हैदराबादच्या खेळाडूंनी डीआरएससाठी अपील केलं. 


सुरुवातीला, हे अपील झेलबादसाठी असल्याचा पंचांचाही समज झाला. तिसऱ्या पंचांनीही ते तपासून पाहिलं आणि अमित मिश्राला नाबाद ठरवलं. परंतु, हैदराबादचं अपील 'ऑब्सट्रक्टिंग द फील्ड'साठी होतं. आपण धाव पूर्ण करू शकणार नाही, याची कल्पना आल्यानं अमित मिश्रा स्टम्पच्या समोरून धावत होता. खलीलनं फेकलेला चेंडू त्याच्यामुळे अडला होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी पुन्हा संपूर्ण प्रसंग तपासून अमित मिश्राला बाद दिलं. 

Web Title: What does Khaleel Ahmed's 'phone call' celebration mean? Twitter tries to decode pacer's act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.