मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली जायबंदी आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नाकाला दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळता येणार नाही. पण या दुखापतीतून सारवण्यासाठी आणि फिटनेस कायम राखण्यासाठी कोहली काय करतो, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. दस्तुरखुद्द कोहलीनेच आपण फिटनेससाठी काय करतो, हे ट्विटवर व्हीडीओ पोस्ट करून सांगितले आहे.
आयपीएलचा 51वा सामना बँगलोर आणि हैदराबाद या दोन संघात होणार होता. या सामन्यात कोहलीच्या नाकाला दुखापत झाली आणि त्यामुळेच कौंटी क्रिकेटमध्ये सहभागी होता येणार नाही. या दुखापतीतून सावरताना कोहली म्हणाला की, " माझ्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. दुखापतीतून सारवण्यासाठी मी अथक परीश्रम घेत आहे. फिटनेससाठी माझा व्यायामही सुरु आहे. अथक परीश्रमाचे फळ चांगलेच मिळते. "
विराटची 15 जूनला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तंदुरुस्ती चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये तो पास झाला तरच त्याला जून आणि जुलै महिन्यांमध्ये होणाऱ्या परदेशातील सामन्यांमध्ये खेळता येईल. पण जर त्याला आपली तंदुरुस्ती राखता आली नाही तर भारतीय क्रिकेट संघापुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते.