मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केली. ही गोष्ट क्षेत्ररक्षक कॅमेरून बेनक्रॉफ्ट आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी मान्यही केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्मिथला कर्णधारपदावरून तर डेव्हिड वॉर्नरची उपकर्णधार पदावरून हकालपट्टी केली. हे सारे आपण पाहिले. पण चेंडूशी छेडछाड म्हणजे नेमके काय, कोणत्या वस्तूंमुळे चेंडूशी छेडछाड केली जाते, त्याचा काय फायदा होतो, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नेमके केले तरी काय या गोष्टी जाणून घेऊया.
चेंडूशी छेडछाड का केली जातेजेव्हा बऱ्याच काळापासून फलंदाज बाद होत नसतो, तेव्हा जास्तकरून चेंडूशी छेडछाड केली जाते. चेंडूशी छेडछाड केली तर गोलंदाजाला चांगला स्विंग मिळतो किंवा चेंडू अधिक वेगाने जातो. या प्रकारच्या चेंडूंवर स्थिरस्थावर झालेला फलंदाज चकतो.
चेंडूंशी छेडछाड म्हणजे कायअवैधपणे चेंडूवर प्रयोग केले तर ती छेडछाड ठरते. यामध्ये काही वेळा चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूवर छोटेखानी खड्डे केले जातात, जेणेकरून खेळाडूला चांगली ग्रीप मिळू शकते. चेंडूच्या शिलाईवर काही प्रयोग केले जातात. काहीवेळा चेंडूची शिलाई ढीलीही केला जाते. त्याचबरोबर चेंडूचा पृष्ठभाग बदलण्याचा प्रयत्न केला जातो.
चेंडूशी छेडछाड कोणत्या गोष्टींद्यारेकेली जातेबऱ्याच वर्षांपूर्वी चेंडूला ग्रीस लावून त्याचा पृष्ठभाग बदलला जायचा. काही वर्षांनी ग्रीसचा वापर बंद झाला, त्यानंतर जेली बिन्स याप्रकारासाठी वापरल्या जाऊ लगाल्या. चेंडूच्या शिलाईबरोबर काही जणांनी आपल्या नखांनी किंवा टणक वस्तूने छेडछाड करायचा बऱ्याचदा प्रयत्न केला आहे. धातूच्या वस्तूने किंवा टेपच्या माध्यमातून चेंडूचा पृष्ठभाग किंवा आकार बदलल्याचे काही प्रकार घडले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नेमके केले तरी कायकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.