बीसीसीआय आणि आशियाई क्रिकेट असोसिएशनमधील मोठ्या जबाबदारीनंतर जय शाहा आता आयसीसीचा कारभार हाती घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झालीये. यासह त्यांनी सर्वात युवा ICC अध्यक्ष होण्याचा इतिहासही रचला आहे. एका बाजूला भारतीय क्रिकेटसह जय शाह यांच्यासाठी हे 'अच्छे दिन' आहेत. दुसरीकडे पाकिस्तानसाठी मात्र धोक्याची घंटा वाजली आहे.
जय शहा कारभारी, आता पाकिस्तान क्रिकेला मोठं टेन्शन
जय शाह आयसीसीचे कारभारी होणार ही बातमी ऐकून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची झोप उडाली असेल. कारण आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात पाकिस्तान आयसीच्या जोराव उड्या मारत होता. आता जय शाह अध्यक्षस्थानी विराजान झाल्यामुळे पाकिस्तानची अवस्था अगदी बिकट होण्याचे संकेत मिळत आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भातील पाकचा डाव फसणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. दुसरीकडे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाण्यास राजी नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामने पाकिस्तान बाहेर, आयोजित करावे, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील होते. त्यात आता जय शहा हे ICC चे नवे बॉस झाल्यामुळे पाकिस्तानच्या पदरी मोठी निराशा येऊ शकते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद त्यांच्याकडे कायम राहिलं तरी आशिया चषकाप्रमाणे हायब्रीड मॉडेल पॅटर्न इथंही पाहायला मिळू शकतो. ही डील पाकिस्तानसाठी घाट्याचीच असेल.
आधी आशिया कप स्पर्धेत पाकला दिला होता दणका, आता ICC स्पर्धेतही बसणार फटका
२०२३ मध्ये आशिया कप स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानला मिळाले होते. यावेळीही बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. या डावात भारतानेच बाजी मारली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताच्या सामन्यासह महत्त्वाच्या लढती म्हणजे सेमी फायनल आणि फायनल श्रीलंकेत आयोजित करावी लागली होती. त्यावेळी जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्षही होते. आता पुन्हा ICC चा कारभार पाहताना ते पाकिस्तान क्रिकेटला मोठा दणका देताना दिसेल.