पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

पाकिस्तान क्रिकेट सध्या खूपच बिकट परिस्थितीत असल्याचे दिसून येते. जाणून घेऊयात त्यामागची काही प्रमुख कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:48 PM2024-10-11T13:48:51+5:302024-10-11T13:51:38+5:30

whatsapp join usJoin us
What has gone wrong with the Pakistan cricket team 5 reasons behind Poor results | पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs England, 1st Test : पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. इंग्लंड विरुद्धच्या ३ सामन्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मुल्तानच्या मैदानात रंगला होता. या सामन्यातील पहिल्या डावात ५०० पेक्षा अधिक धावा करूनही पाकिस्तानच्या पदरी निराशा आली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट सध्या खूपच बिकट परिस्थितीत असल्याचे दिसून येते. जाणून घेऊयात त्यामागची काही प्रमुख कारणं

क्रिकेटच्या मैदानात एखाद्या संघाचा पराभव झाला की, तो संघ बॅटिंगमध्ये कमी पडला की, बॉलिंगमध्ये? कोणता खेळाडू कमी पडला? असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. पण पाकिस्तान संघाच्या पराभवाच्या मालिकेमागे यापलिकडच्याही अनेक गोष्टी आहेत. २०१६ ते २०१९ या कालावधीत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या मिकी आर्थर यांनी Al Jazeera ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या अपयशामागची काही प्रमुख कारणं सांगितली होती. त्यातून पाक संघ कुठं गडबडलाय ते स्पष्ट होते.   

पाक संघात दर्जेदार खेळाडूंचा अभाव नाही, पण....

पाकिस्तानच्या संघात दर्जेदार खेळाडूंची कमी नाही. संघात अविश्वसनीय खेळाडू आहेत. पण या संघात स्थिरतेचा अभाव आहे. यशस्वी व्हायचं असेल तर स्थिरता महत्त्वाची असते.  संघ निवड, खेळाडूंच्या भूमिकेत सातत्य आणि प्रत्येक खेळाडूनं आपली भूमिका काय ते समजून घेतले, पाहिजे. पण या गोष्टी पाक संघात होत नाहीत, असे ते म्हणाले होते.

पाक क्रिकेट बोर्डातील अंतर्गत गोष्टीचा संघाला बसतोय मोठा फटका 

पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत अस्थिरता आहे. ज्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होताना दिसतो. खेळाडू संघासाठी खेळण्यापेक्षा स्वत:साठी खेळतो. कारण टीम मॅनेजमेंटमध्ये पुढे कुणाची एन्ट्री होईल, त्यात आपलं स्थान टिकेल का? अशी भिती खेळाडूंच्या मनात असते, ही गोष्टही ऑर्थर यांनी बोलून दाखवली होती.  

कारभारीच धड नाही, संघ कसा मजबूत होणार?

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (PCB) कारभार कळण्यापलिकडचा आहे. २०२२ मध्ये माजी क्रिकेटर रमीज राजा यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. इथूनंच पाक क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ सुरु झाली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार तीन वेगवेगळ्या चेहऱ्यांनी सांभाळला. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने टीममध्ये बदल केले. सध्याच्या घडीला  मोहसिन नक्वी हे पाक क्रिकेट बोर्डाचा कारभार सांभाळत आहेत. 

कॅप्टन्सीचा खेळ

भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर बाबर आझम याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाची कॅप्टन्सी सोडली. त्यानंतर पाकिस्तान संघान क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगळा कर्णधार (Split Captaincy) हा  प्रयोग आजमवला. ज्याच्या माध्यमातून शान मसूदकडे कसोटीचे नेतृत्व देण्यात आले. दुसरीकडे शाहीन शाह आफ्रिदी टी-२० संघांचा कर्णधार झाला. पण त्याच्याकडील नेतृत्व फक्त एका मालिकेपुरतेच राहिले. नक्वी हा नवा चेहरा अध्यक्षपदावर विराजमान होताच पुन्हा बाबर आझम कॅप्टन्सीच्या रोलमध्ये दिसला. पुन्हा त्याने राजीनामा दिला. कॅप्टन्सीतील हा खेळही पाकिस्तानच्या क्रिकेटमधील गडबड घोटाळ्याचा एक पुरावाच आहे.

कोच बदलाचा सिलसिला

२०२२ पासून आतापर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघात ७ प्रशिक्षक दिसले आहेत.  सकलेन मुश्ताक, अब्दुल रहमान (कार्यवाहू प्रशिक्षक), ग्रांट ब्रँडबर्न, मोहम्मद हफीज, अझहर महमूद (कार्यवाहू प्रशिक्षक), गॅरी कर्स्टन (सध्याचा व्हाइट बॉल कोच) आणि जेसन गिलेस्पी (सध्याचा रेड बॉल क्रिकेट कोच)  

Web Title: What has gone wrong with the Pakistan cricket team 5 reasons behind Poor results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.