India vs England, 3rd T20I - भारतीय संघाला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माला ( Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यासाठी कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) डच्चू दिले. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियानं मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती आणि तिसऱ्या सामन्यात विराटनं विजयी संघात बदल केला. मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवला वगळल्यानं अनेकांनी टीका केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं कर्णधार विराटला खडेबोल सुनावले. R Ashwin : रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; नक्की काय घडलं की आर अश्विन असं म्हणाला
१४ मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार आणि इशान किशन यांना पदार्पणाची संधी मिळाली. पण, त्या सामन्यात सूर्यकुमारला खेळण्याची संधीच मिळाली नाही. तरीही तिसऱ्या सामन्यात त्याला बाकावर बसवण्याचा निर्णय विराटनं घेतला, तेच दुसरीकडे सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) आणखी एक संधी दिली. विराटच्या निर्णयावर गंभीर म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेच्या सात महिन्यांपूर्वी तो वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आणि कदाचित वर्ल्ड कपनंतर पुढील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो तयारीच करताना दिसेल. सूर्यकुमार यादवमध्ये असं काय पाहिलं की त्याला एकही चेंडू न खेळतानाही बाकावर बसवलं. तो दुखापतग्रस्त असता तर प्रश्नच नव्हता.'' सूर्यकुमार यादवला एकही चेंडू न खेळवता बाकावर बसवलं, काय आहे विराट कोहलीचा प्लान?
''त्याला किमान तीन-चार सामने संधी द्या आणि मग निर्णय घ्या. त्यानं चांगली कामगिरी केली, तर चौथ्या क्रमांकासाठी एक चांगला बॅकअप खेळाडू मिळेल. आपण सातत्यानं वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीबाबत बोलत आहोत, परंतु यात कोणतीच तयारी दिसत नाही,''असेही गंभीर म्हणाला. लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखण
काय आहे विराटचा प्लान?
आगामी आयपीएल आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेता विराट कोहली पुढील काही सामन्यांत विश्रांत घेण्याची शक्यता आहे. अशात उर्वरित दोन ट्वेंटी-20 सामन्यांत विराट स्वतः किंवा अन्य कोणत्यातरी खेळाडूला विश्रांती देऊन सूर्यकुमार यादवला खेळवण्याची शक्यता अधिक आहे. Ind Vs Eng T20 Live Match
Web Title: What have you seen of Suryakumar Yadav? Gautam Gambhir slams Virat Kohli's decision to drop Mumbai batsman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.