ठळक मुद्देकॅमेऱ्यात कैद झालेला मोहम्मद सिराजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओचा आणि फोटोचा संदर्भ देत कैफने मुस्लिमांना देशभक्ती शिकवणाऱ्या काही लोकांना चपराक लगावली आहे.
मुंबई - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील कसोटीच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या डोळ्यात अश्रू तरळले. एकीकडे देशाचं राष्ट्रगीत सुरू असताना दुसरीकडे भावूक झाल्यामुळे सिराजचे डोळे पाणावल्याचे सर्वांनी पाहिलं. काही वेळातच सिराज हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका रिक्षावाल्याचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज हा प्रवास सिराजसाठी नक्कीच सोपा नव्हता. त्यामुळेच, त्याचे डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सिराजचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी येऊन धडकली, कोरोना संकटात बायो-बबल नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे त्याला वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आले नाही... मुलानं टीम इंडियाकडून खेळावं हे स्वप्न त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पूर्ण केलं. कसोटी पदार्पणातच दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला... एका रिक्षाचालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा प्रवास डोळ्यासमोर जेव्हा उभा राहतो, तेव्हा अश्रू अनावर होणे साहजिकच आहे... मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) याची ही कहाणी. तिसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना सिराजच्या डोळे पाणावले होते. आपल्या भावनांना अश्रूंवाटे तो वाट मोकळी करून देत होता.
कॅमेऱ्यात कैद झालेला मोहम्मद सिराजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओचा आणि फोटोचा संदर्भ देत कैफने मुस्लिमांना देशभक्ती शिकवणाऱ्या काही लोकांना चपराक लगावली आहे. 'मला फक्त काही लोकांना या फोटोची आठवण करुन द्यावी वाटते. हा सिराज मोहम्मद आहे, आणि देशाचं राष्ट्रगीत त्याच्यासाठी किती महान आहे,' असे ट्विट मोहम्मद कैफने केले आहे.
सिराजला 500 रुपये बक्षीस
स्थानिक स्पर्धांमध्ये तो जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते. क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता. सिराजचे वडील रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र मेहनत करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला.मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजचे वडील मोहम्मद गौस ( ५३ वर्ष) यांचे निधन झाले, त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.
संधीचं सोनं केलं
मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि सिराजला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्यानं दोन्ही डावांत ( २/४० व ३/३७) पाच विकेट्स घेतल्या. बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला. तसेच पदार्पणात गोलंदाजीत ओपनिंग न करताना भारतीय गोलंदाजानं केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी सय्यद अबीद अली यांनी १९६७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत ११६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होता. तिसऱ्या कसोटीपूर्वी राष्ट्रगीताच्यावेळी भावुक झालेला सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Web Title: This is what is meant ... Mohammad Kaif shared a photo of Siraj and told some people
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.