कर्णधार ज्यो रुट इंग्लंडसाठी ‘रनमिशन’ ठरताना दिसतो. खोऱ्याने धावा करूनही रुटला आतापर्यंत आयपीएलमधील एकाही संघाने संधी दिलेली नाही. ही बाब रुटला रुचलेली नाही. त्याने भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांना ही खंत बोलून दाखवली. गोयंका यांनी रुटच्या शंभराव्या कसोटीतील द्विशतकानंतर ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी "आपल्या शंभराव्या कसोटीत द्विशतक झळकावत ज्यो रुटने मास्टरस्ट्रोक लगावला. रुट मला भेटल्यावर म्हणाला होता की, आयपीएलमधील कोणताच संघ मला संधी का देत नाही? आयपीएलमध्ये स्थान मिळवण्यासाठी मी अजून काय करायला हवे?" गोयंका यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. रुटने चेन्नईत द्विशतक करण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २२८ तर दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी रूटने शतक झळकावले. रुटचे ही १००वी कसोटी आहे. दरम्यान, जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला प्रेरणादायी कर्णधार ज्यो रुट याच्या शंभाराव्या कसोटीत विजय ही संघासाठी मोठी भेट ठरेल,असा विश्वास इंग्लंडचा उपकर्णधार बेन स्टोक्स याने व्यक्त केला. स्टोक्सने रुटला शंभराव्या सामन्याची कॅप प्रदान केली होती.स्टोक्स म्हणाला,‘ मी पुढील काही दिवस फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणाद्वाारे विजयासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही स;र प्रकारात विजय मिळविण्यास उत्सुक आहोत. ब्रिस्टल येथे एका नाईट क्लबमध्ये घडलेल्या घटनेनंतर करियरच्या खराब काळात रूटने मला साथ दिल्याची आठवण स्टोक्सने ‘गार्डियन’ या वृत्तपत्रातील स्तंभात लिहिली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयपीएलमध्ये संधी मिळविण्यासाठी अजून काय करायला हवे?; ज्यो रुटचा संतप्त सवाल
आयपीएलमध्ये संधी मिळविण्यासाठी अजून काय करायला हवे?; ज्यो रुटचा संतप्त सवाल
रुटने चेन्नईत द्विशतक करण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २२८ तर दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या होत्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 5:52 AM