Join us  

मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा

टी-२० वर्ल्डकप पटकावल्यानंतर बीसीसीआय आणि विविध राज्य सरकारकडून टीम इंडियातील खेळाडूंचा सन्मान केला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 1:25 PM

Open in App

नवी दिल्ली - टी २० वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियातील खेळाडूंना अनेकांनी बक्षिस जाहीर केले. त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला त्याच्या घरासाठी जमीन आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर हा तेलंगणा सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. 

सिराजशिवाय दोन वेळा विश्वविजेता बॉक्सर निकहत जरीनलाही तेलंगणा सरकार सरकारी नोकरी देणार आहे. या दोन खेळाडूंना कोणत्या गटातील नोकऱ्या मिळणार याबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. मोहम्मद सिराज आणि निकहत जरीन यांना राज्य सरकारकडून ग्रुप १ ची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी बुधवारी याबाबत विधानसभेत सांगितले, लवकरच प्रस्ताव कॅबिनेटमध्ये चर्चेला येईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल. 

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, सिराजने फक्त इंटरमिडिएटपर्यंतच शिक्षण घेतले आहे, पण तो उंची गाठण्यात सक्षम आहे. निकहत जरीन निजामाबादचा रहिवासी आहे, तर सिराज हैदराबादचा आहे. यापूर्वीच्या बीआरएस सरकारने निकहत नोकरी का दिली नाही याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गट-१ नोकरी म्हणजे मोहम्मद सिराजने पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेतल्यास त्याला थेट डीएसपी पदावर नियुक्ती मिळेल. टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी टीम इंडियाच्या मुख्य संघात समाविष्ट असलेल्या मोहम्मद सिराजला एकूण तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहोचली तेव्हा खेळपट्टीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

सिराज श्रीलंका दौऱ्यावर

मोहम्मद सिराज सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. नुकतीच त्याने तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली. आता तो एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजचे आकडे खूपच प्रभावी आहेत. त्याने या संघाविरुद्ध आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळले असून ७.७ च्या सरासरीने १९ बळी घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेटही केवळ ३.५ राहिला आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024मोहम्मद सिराजतेलंगणाभारतीय क्रिकेट संघ