Join us  

काय आहे टुकटुक अकॅडमी?; धोनी, मॅक्सवेल, केदारनंतर आता यशस्वी जैस्वालही निशाण्यावर

मिमर्सनी आता राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर १८ वर्षांचा यशस्वी जैस्वाल यालाही निशाण्यावर घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 9:42 PM

Open in App

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचे अनेक नवनवे मिम्स व्हायरल होत आहेत. त्यात डिंडा अकॅडमीनंतर आता टुकटुक अकॅडमीच्या ट्रेंडची सुरूवात झाली आहे. एकवेळ फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले महेंद्र सिंग धोनी, ग्लेन मॅक्सवेल, केदार जाधव यासारखे खेळाडू टुक टुक करत एक किंवा दोन धावा काढु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टिका करण्यासाठी हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यात मिमर्सनी आता राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर १८ वर्षांचा यशस्वी जैस्वाल यालाही निशाण्यावर घेतले.

यशस्वीने दिल्ली विरोधात खेळताना ३६ चेंडूत ३४ धावा केल्या होत्या. ही खेळी आयपीएलला साजेशी नसल्याने यशस्वी हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. मात्र अशा प्रकारे सोशल मिडियात खिल्ली उडत असल्याने युवा खेळाडूंचे मनोबल कमी होऊ शकते. त्यामुळे त्याच्या मदतीला आकाश चोप्राने या ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

आकाश चोप्राने ट्विट केले की, एक वेळ वरिष्ठ खेळाडू ही गंमत म्हणून सहजतेने घेऊ शकतात. मात्र युवा खेळाडूंना अशा प्रकारच्या टिकेची सवय नसते. त्यांचे मनोबल निश्चीतच खालावु शकते. याच प्रकारच्या ट्विटमध्ये केदार जाधवचा उल्लेख हा ‘लॉर्ड केदार’ म्हणून देखील होत आहे. मात्र या वरिष्ठ खेळाडूंना अशाप्रकारच्या टिकेची सवय झालेली असते. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. यशस्वीचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला आहे.  त्याने कठीण परिस्थितीला तोंड देत आपले क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्नही साकारले आहे.

टॅग्स :IPL 2020