नवी दिल्ली : रवनित सिंग रिकी क्रिकेट अकादमी चालवितो आणि एअर इंडियामध्ये नोकरी करतो. मॅच फिक्सिंगच्या स्टिंग आॅपरेशननंतर बीसीसीआयने पाच वर्षांसाठी निलंबित केलेल्या शलभ श्रीवास्तवला लोक विसरले आहेत. अजितेश अर्गलने आपल्या १० प्रथम श्रेणी सामन्यांपैकी शेवटचा सामना २०१५ मध्ये खेळला होता. स्मित पटेल आपली प्रथम श्रेणी कारकीर्द वाचविण्यासाठी भारतातील सर्वांत कमकुवत स्थानिक संघ त्रिपुराकडून खेळत आहे. या सर्वांमध्ये एक बाब समान आहे. हे सर्व २०००, २००८ आणि २०१२ च्या विश्वकप विजेत्या संघाचे सदस्य होते.
रिकीला विश्वकप २००० मध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरविण्यात आले होते. ही तीच स्पर्धा आहे त्यातून भारताला युवराज सिंग व मोहम्मद कैफ यांच्यासारखे खेळाडू मिळाले. डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीवास्तव २००० मध्ये सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजांमध्ये तिस-या स्थानी होता.
भारतीय चाहते अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत मिळवलेल्या यशाचा जल्लोष करीत असताना उन्मुक्त चंदने केलेल्या टिपणीवर विचार करण्याची गरज आहे. उन्मुक्तने म्हटले होते की,‘विराट कोहलीच्या प्रत्येक कहाणी व्यतिरिक्त उन्मुक्त चंद आणि शिखर धवन यांचीही एक कहाणी असते.’
पृथ्वी शॉ, शुभमान गिल, मनज्योत कालरा, शुभम मावी किंवा कमलेश नारकोटी हे प्रतिभावान खेळाडू आहेत, यात शंका नाही, पण यापैकी किती खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडतात, हे सांगणे घाईचे ठरेल. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोपडा म्हणाला, ‘काही खेळाडू आगेकूच करतील, पण काहीची कारकीर्द प्रदीर्घ काळ लांबणार नाही, हे सत्यही स्वीकारावे लागेल.’
चोपडा व माजी भारतीय यष्टिरक्षक दीप दासगुप्ता यांच्या मते भारत ‘अ’ संघाच्या अधिक मालिका आणि राहुल द्रविड प्रशिक्षक असल्यामुळे भविष्यासाठी काही खेळाडू तयार मिळतील.
दासगुप्ता म्हणाला,‘भारत ‘अ’ संघ आता इंग्लंड दौ-यावर जाणार आहे. राहुल द्रविड संघासोबत जुळले असल्यामुळे पृथ्वी, शुभमान, कमलेश व शिवम यांची चाचणी घेण्यासाठी या दौ-यात संधी मिळू शकते.’
Web Title: What U-19 World Cup stars are doing now you will be shock
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.