नवी दिल्ली : ‘आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील २०१३ साली झालेली स्पॉट फिक्सिंगची घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. यामुळे मी पहिल्यांदाच अत्यंत निराश झालो होतो,’ असे सांगत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पहिल्यांदाच या फिक्सिंग प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, ‘या प्रकरणात खेळाडूंची काय चूक होती?’ असा प्रतिप्रश्नही धोनीने केला.
गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना या प्रकरणावर धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. कारण यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संघावर दोन वर्षांची बंदी लागलीच, शिवाय फिक्सिंग प्रकरणामध्ये धोनीवरही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळेच आपण आयुष्यात पहिल्यांदाच निराशेच्या गर्तेत अडकलो होतो, असे धोनीने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी शानदार पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने थेट जेतेपदावर कब्जा करत आपला हिसका दाखवून दिला. या धमाकेदार पुनरागमनावर आधारित असलेल्या ‘रोर आॅफ दी लायन’ या वेब सीरिजमध्ये धोनीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये धोनीने म्हटले आहे की, ‘या प्रकरणाआधी मी कधीच इतका निराश झालो नव्हतो. या घटनेनंतर माझ्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आणि दोन वर्षे आमचा संघ आयपीएल खेळू शकला नाही. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात खराब वेळ होती. २००७ साली भारतीय संघ खराब प्रदर्शनामुळे हरला होता, पण २०१३चे स्पॉट फिक्सिंग प्रकरण पूर्णपणे वेगळे होते.’
फिक्सिंगमध्ये माझे नाव आले
फिक्सिंग प्रकरणात आमच्या खेळाडूंची काय चूक होती, असा प्रश्न उपस्थित करताना धोनी म्हणाला, ‘आमच्या संघाने चूक केली, मात्र यामध्ये खेळाडू सहभागी होते का? खेळाडूंना कोणत्या कारणामुळे या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागले? फिक्सिंग प्रकरणात माझेही नाव आले.
मीडिया आणि सोशल मीडियामध्ये आमचा संघही यामध्ये समाविष्ट असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. खरंच हे शक्य होतं का? या प्रकरणाविषयी मला दुसऱ्यांशी चर्चा करायची नव्हती. पण मनातून मला या गोष्टी स्वस्थ बसू देत नव्हत्या. यामुळे माझ्या खेळावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. माझ्यासाठी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे आहे.’
मीडिया आणि सोशल मीडियामध्ये आमचा संघही यामध्ये समाविष्ट असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. खरंच हे शक्य होतं का? या प्रकरणाविषयी मला दुसऱ्यांशी चर्चा करायची नव्हती. पण मनातून मला या गोष्टी स्वस्थ बसू देत नव्हत्या. यामुळे माझ्या खेळावर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. माझ्यासाठी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे आहे.’
2013 साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर जुलै २०१५ मध्ये या प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्ज संघासह राजस्थान रॉयल्स संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. कारण, या दोन्ही संघांचे अधिकारी गुरुनाथ मय्यपन आणि राज कुंद्रा यांचा सट्टेबाजी घडामोडींमध्ये असलेला सहभाग स्पष्ट झाला होता.
Web Title: What was wrong with our players in spot-fixing? Mahendra Singh Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.