भारतीय क्रिकेटचा सर्वात वाईट काळ कोणता? मास्टर ब्लास्टरनं केला खुलासा

जवळपास दोन दशकं क्रिकेट खेळणाऱ्या सचिननं भारतीय संघातील सर्व चढउतार पाहिले आहेत. सचिनच्या मते 2006-7 हा भारतीय संघासाठी सर्वात कठीण काळ होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 06:01 PM2017-09-12T18:01:51+5:302017-09-12T18:01:51+5:30

whatsapp join usJoin us
What is the worst time of Indian cricket? Master Blaster reveals the ban | भारतीय क्रिकेटचा सर्वात वाईट काळ कोणता? मास्टर ब्लास्टरनं केला खुलासा

भारतीय क्रिकेटचा सर्वात वाईट काळ कोणता? मास्टर ब्लास्टरनं केला खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देचॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय क्रिकेटचे अतिशय नुकसान झाले. चॅपेल हे जाहीरपणे आम्हा क्रिकेटपटूंच्या खेळावरील निष्ठेबाबत संशय घेत होते. वर्ल्डकप हातात घेण्यासाठी मला 21 वर्ष वाट पहावी लागली.भारताला बांगलादेश आणि श्रीलंकेच्या संघाकडून पराभवचा सामना करावा लागला होता. 2007 नंतर भारतीय संघात अनेक सकारात्मक परिवर्तन झाले.

मुंबई, दि. 12 - क्रिकेटच्‍या मैदानालाच आपले दुसरे घर मानणारा सचिन तेंडूलकर दोन वेळा भारतीय संघाचा कर्णधार राहिला आहे. मात्र कर्णधार पदावर राहताना कारकिर्दीकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच त्‍याने ते पद सन्‍मानपूर्वक नाकारले होते. आज माध्यमांशी बोलताना मास्टर ब्लास्टरने आपल्या 20 वर्षाच्या क्रिकेट करियरमध्ये भारतीय संघाचा सर्वात वाईट काळ कोणता होता याचा खुलासा केला आहे.

जवळपास दोन दशकं क्रिकेट खेळणाऱ्या सचिननं भारतीय संघातील सर्व चढउतार पाहिले आहेत. सचिनच्या मते 2006-7 हा भारतीय संघासाठी सर्वात कठीण काळ होता. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्याने आपले मत व्यक्त केलं. तो म्हणाला की, वेस्ट इंडिजमध्ये झालेला 2007 च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होतं. भारताला बांगलादेश आणि श्रीलंकेच्या संघाकडून पराभवचा सामना करावा लागला होता. 2007 नंतर भारतीय संघात अनेक सकारात्मक परिवर्तन झाले.

क्रिकेटमधील विक्रमांचा बादशाह असलेल्या मास्टर ब्लास्टर म्हणाला, माझ्या 2006-07 हा काळ भारतीय संघासाठी सर्वात कठिण काळ होता. वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या संघाला सुपर आठ फेरीतही पोहचता आले नाही. या पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंच मनोबल पुर्णपणे खचलं होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नव्यानं विचार केला. नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा पर्यत्न केला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.

तेंडुलकर म्हणाला, वर्ल्डकप नंतर आम्हाला अनेक बदल करावे लागले. त्यामुळे आम्ही संघासाठी ठोस निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला आहे. त्याचा निकाल तुम्ही पाहिलातच. यावेळी आम्ही घेत असलेले निर्णय यशस्वी होतील का? ही भीती मनात होतीच. पण आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या रिझट्लसाठी आम्हाला वाट पहावी लागली. वर्ल्डकप हातात घेण्यासाठी मला 21 वर्ष वाट पहावी लागली.


ग्रेग चॅपल रिंगमास्टर - आत्मचरित्रातून सचिनचा हल्लाबोल
चॅपेल यांच्या २००५ ते २००७ या प्रशिक्षकपदाचा कालावधी नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. सचिनच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने तो कालावधी पुन्हा चर्चेत आला होता. चॅपेल यांचा उल्लेख त्याने रिंगमास्टर असाही केला. वेस्ट इंडिजमध्ये २००७मध्ये झालेल्या वर्ल्डकपपूर्वी राहुल द्रविडऐवजी मी कर्णधारपद स्वीकारावे असा तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा आग्रह होता,ह्णह्ण असा नवीन गौप्यस्फोट सचिनने त्याच्या आत्मचरित्रातून केला आहे. इतकेच नाही तर कर्णधारपद स्वीकारावे, यासाठी ग्रेग चॅपेल यांनी सचिनच्या घरी भेट दिली होती हेदेखील त्यातून समजले. भारताच्या त्या अपयशाला मी चॅपेल यांना जबाबदार ठरवेन. चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय क्रिकेटचे अतिशय नुकसान झाले. चॅपेल हे जाहीरपणे आम्हा क्रिकेटपटूंच्या खेळावरील निष्ठेबाबत संशय घेत होते. त्यामुळे प्रकरण बिघडतच गेले. यास्थितीत संघातील ब-याच सिनियर क्रिकेटपटूंना चॅपेल नको होते. सौरव गांगुलीच्याबाबतीत चॅपेल यांचा गाजलेला जाहीर वाद हा अनाठायी होता. भारताच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक सौरव गांगुली आहे. तेव्हा गांगुलीने संघात राहावे की नाही हे ठरवण्याचा अधिकार चॅपेल यांना निश्चित नाही. संघातील सर्व सिनियरना हटवण्याचा चॅपेल यांचा एक डाव होता. त्याबाबत ते बीसीसीआयशीदेखील बोलले होते.

ग्रेग चॅपल वेडा माणूस - गांगुली
भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्यातला वाद सर्वश्रुत आहेच. सौरव गांगुलीने चॅपल यांना माध्यमांशी बोलताना चक्क वेडा म्हटलं होतं. भारताच्या कोचपदावरून त्यांची हकालपट्टी केली त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अकादमीतूनही त्यांना काढण्यात आलं. आता सचिन तेंडुलकरला आऊट कसं करायचं याचे धडे चॅपल ऑस्ट्रेलियन टीमला देत आहे. पण सचिनला आऊट करणं सोपं नाही हे त्यांना ठाऊक नसावं असं गांगुलीनं म्हटलं होतं.

 

२००७ विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी - 

२००७च्या विश्वचषकात भारताचा समावेश ब गटात कऱण्यात आला होता. या गटात भारतासह श्रीलंका, बांगलादेश आणि बर्म्युडा यासंघाचा समावेश होता.

17 मार्च 2007 (भारत वि. बांगलादेश)
नवव्या विश्वचषकात भारताचा सलामीचा सामना बांगलादेश विरुद्ध रंगला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ४९.३ षटकात सर्वबाद १९१ धावा केल्या आणि बांगलादेशसमोर विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले. या डावात भारताच्या सौरव गांगुलीने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर युवराज सिंगने ४७ धावा केल्या. भारताचे आव्हान बांगलादेशने पाच विकेट राखत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. या डावात बांगलादेशच्या तीन फलंदाजांनी यावेळी अर्धशतक साकारले. भारताच्या खराब प्रदर्शनामुळे संघाला चाहत्यांच्या रोषाला बळी पडावे लागले. सर्व ठिकाणाहून संघावर टीका कऱण्यात आली.

19 मार्च 2007 (भारत वि. बर्म्युडा)
पहिल्या सामन्यात धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर भारताचा दुसरा सामना नवख्या बर्म्युडा संघाशी झाला. भारताने प्रथम फलंदाजी करत ४१३ धावांचा डोंगर उभारला. विरेंद्र सेहवागने ११४ धावांची खेळी साकारली, तर युवराज सिंग(८३), सचिन तेंडुलकर(नाबाद ५७), सौरव गांगुली(८९) धावा केल्या. भारताने ठेवलेले ४१४ धावांचे भलेमोठे आव्हान पेलताना बर्म्युडाचा संघ १५६ धावांत तंबूत परतला आणि भारताने तब्बल २५७ धावांनी विजय मिळवला. 

23 मार्च 2007 (भारत वि. श्रीलंका)
साखळी सामन्यातील भारताची तिसरी लढत श्रीलंकेविरुद्ध झाली. या लढतीत भारताने नाणेफेक जिंकली आणि श्रीलंकेला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. श्रीलंका संघाने ५० षटकात भारतासमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले. सौरव, सेहवाग, सचिनसारखे फलंदाज असल्याने भारत हे आव्हान सहज पूर्ण करेल अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारताचा संपूर्ण संघ १८५ धावांत तंबूत परतला. भारताचे भरवशाचे फलंदाज सचिन आणि महेंद्रसिंग धोनी हे दोनही फलंदाज शून्यावर बाद झाले. कर्णधार राहुल द्रविडने ६० धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सफल झाला नाही. भारताचा ६९ धावांनी पराभव झाला आणि भारत साखळी फेरीतच विश्चषक स्पर्धेबाहेर फेकला गेला. 
 

Web Title: What is the worst time of Indian cricket? Master Blaster reveals the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.