आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून इशान किशन ( Ishan Kishan) याला संधी न दिल्याने माजी खेळाडूंसह अनेक जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत इशानला केवळ प्रत्येकी १ सामना खेळण्याची संधी दिली. सलामीवीर म्हणून बॅक अप साठी इशान हा योग्य पर्याय असल्याचे अनेकांचे मत आहे आणि डावखुऱ्या फलंदाजाने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून ते सिद्धही केलं आहे. त्याला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात निवडायला हवे होते, असे क्रिकेट तज्ज्ञाचे मत आहे. अशात इशान किशननेही निवड न झाल्याबाबत त्याचे मत मांडले आहे.
इशान किशन म्हणाला, जे काही घडलं ते योग्य होतं. खेळाडूंची निवड करण्यापूर्वी निवड समिती खूप विचार करते. निवड न होण्याकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. मी अजून मेहनत घेऊन निवड समितीचा आत्मविश्वास जिंकेन. जेणेकरून ते पुढच्या वेळेस माझी निवड करतील.
दरम्यान, इशान किशनची आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावरील वन डे मालिकेत संघात निवड करण्यात आली आहे. १८ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारतीय संघ - लोकेश राहुल ( कर्णधार), शिखर धवन ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.