२००८ मध्ये फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. तेव्हा सेहवागने त्याला विचारले होते की, या बदल्यात तुला काय पाहिजे. तेव्हा त्याने म्हटले होते की मला मिळणार रक्कम वाढवून द्या.’
केएल राहुलसोबत पंचांनी केला भेदभाव, पोलार्डला केली मदत!; नेमकं प्रकरण काय?
दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. त्यात मिश्राने मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर विरेंद्र सेहवागने जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००८ मध्येदेखील त्यावेळच्या दिल्ली डेअरडेविल्सचा गोलंदाज अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये आपली पहिलीच हॅट्ट्रिक नोंदवली. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार विरेंद्र सेहवागने त्याला विचारले की या बदल्यात तुला काय पाहिजे. त्यावर मिश्रा म्हणाला होता की, विरुभाई माझा पगार वाढवुन द्या.’
२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार?
अमित मिश्राने शानदार गोलंदाजी करत गेल्या वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला १३७ धावातच रोखले. त्यानंतर रिषभ पंतच्या संघाने शानदार फलंदाजी करत मुंबईवर सहज विजय मिळवला. या विजयानंतर सेहवागने आपल्या खास शैलीत हा किस्सा सर्वांसमोर आणला. या सामन्यातही मिश्रा याने २४ धावा देत ४ बळी मिळवले.त्या जोरावरच दिल्लीचा विजय साकारता आला.