मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरेंट 2 सप्टेंबरला काढण्यात आले आहे. त्यावेळी शमीला सरेंडर होण्यासाठी पंधरा दिवासांचा अवधी देण्यात आला होता. अटक वॉरेंट निघाल्यावर शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. पण हा दौरा संपल्यावरही शमी भारतामध्ये परतलेला नाही. शमी नेमका कुठे आहे आणि तो अटक वॉरेंटला कसा सामोरा जातो, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
अटक वॉरेंट निघाल्यावर शमी हा वेस्ट इंडिजमधून थेट भारतामध्ये दाखल होईल आणि कोर्टामध्ये सादर होईल, असेच साऱ्यांना वाटले होते. पण तसे घडताना मात्र दिसत नाही. वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यावर शमी थेट अमेरिकेला रवाना झाला आहे. याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे. त्यामुळे आता अमेरिकेमधून शमी भारतामध्ये कधी येणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
शमी भारतामध्ये नसला तरी तो आपल्या वकिलांच्या संपर्कामध्ये आहे. त्याचबरोबर बीसीसीआयदेखील शमीच्या पाठिशी आहे. जोपर्यंत आपण आरोपपत्र पाहत नाही तोपर्यंत शमीवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. त्यामुळे आता या अटक वॉरेंटविरोधात शमी काय पाऊल उचलतो, याकडेच साऱ्यांचे डोळे लागले आहेत.
मोहम्मद शमीविरुद्ध कोलकाता अलिपोर कोर्टाने अटर वॉरेंट काढले आहे. पण बीसीसीआय मात्र शमीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे. सध्याच्या घडीला शमी हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण पोलिसांनी त्याला पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश अलिपोर कोर्टाने दिले आहेत.
जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.
पत्नी हसीन जहाँने शमीवर गंभीर आरोप केले होते.