Gautam Gambhir: "तुला भारतीय संघाचा कोच बनायचं आहे का?" गौतम गंभीरने दिले मोठे संकेत!  

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:12 PM2022-10-27T14:12:24+5:302022-10-27T14:14:23+5:30

whatsapp join usJoin us
When asked if he wants to become the coach of the Indian team, Gautam Gambhir said that Irfan Pathan can become the coach   | Gautam Gambhir: "तुला भारतीय संघाचा कोच बनायचं आहे का?" गौतम गंभीरने दिले मोठे संकेत!  

Gautam Gambhir: "तुला भारतीय संघाचा कोच बनायचं आहे का?" गौतम गंभीरने दिले मोठे संकेत!  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जातो. यामुळेच तो अनेकदा वादात देखील सापडला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गंभीर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. भारतीय संघाच्या या माजी क्रिकेटपटूने भारतीय संघासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका टीव्ही कार्यक्रमात झालेल्या संवादादरम्यान गौतम गंभीरने भारतीय संघातील पुनरागमनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाचा कोच बनणार का? 
खरं तर टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी भारतीय संघाच्या माजी सलामीवीराला एका टीव्ही कार्यक्रमात वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात टीव्ही अँकरने गौतम गंभीरला विविध प्रश्न विचारले. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे गौतम गंभीर भविष्यात भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून दिसणार का? टीव्ही अँकरने विचारलेल्या या प्रश्नावर गंभीरने मजेशीर उत्तर दिले. "मला काय-काय करताना पाहाल." एकूणच गंभीरने आपण सध्या तरी याबाबत काहीही विचार करत नसल्याचे स्पष्ट केले. 

इरफान पठाण होऊ शकतो प्रशिक्षक - गंभीर
या कार्यक्रमात गौतम गंभीरशिवाय भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण देखील उपस्थित होता. टीव्ही अँकरने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत इरफानची इच्छा जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. यावर गौतम गंभीर इरफानच्या बाजूने म्हणाला, जर इरफान कोचिंगसाठी आला तर तरुणांना दिसेल की एक यशस्वी भारतीय प्रशिक्षक संघाला प्रशिक्षण देत आहे. मी विनोद करत नाही. मी इरफानसोबत खेळलो आहे मला आशा आहे की इरफान प्रशिक्षक होईल. 

गौतम गंभीरच्या या वक्तव्यानंतर टीव्ही अँकर म्हणाला, "ठीक आहे. तु फलंदाजीचा प्रशिक्षक आणि इरफान गोलंदाजी प्रशिक्षक. होय, इरफानने कोचिंगला यायलाच हवे. पुढील काही वर्षांत भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात असेल.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: When asked if he wants to become the coach of the Indian team, Gautam Gambhir said that Irfan Pathan can become the coach  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.