मुंबई : आचरेकर सरांनी भारतरत्न सचिन तेंडुलकरसहविनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले. त्यामुळे एकेकाळी भारतीय संघात आचरेकर सरांच्या शिष्यांचा दबदबा होता. त्यामुळे 1993 साली झालेल्या वानखेडेवरील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला होता, अशी आठवण इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितली आहे.
इंग्लंडचा संघ 1993 साली भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी इंग्लंड आणि भारत यांच्यातील एक सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची भेदक मारा केला. पण आचरेकर सरांच्या शिष्यांनी हा सामना चांगलाच गाजवला होता.
या सामन्यात डावखुरा फलंदाज विनोद कांबळीने नेत्रदीपक द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर सचिन आणि प्रवीण अमरे यांनी अर्धशतके लगावली होती. त्यामुळे भारताच्या धावफलकामध्ये या तीन फलंदाजांचीच नावं ठळकपण दिसत होती. हे तिन्ही खेळाडू मुंबईचे, त्याचबरोबर हे तिघेही आचरेकर सरांचे शिष्य होते. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध शारदाश्रम असा फलक झळकला आणि तो लक्षवेधी ठरला होता.
आज सकाळी आचरेकर सरांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. आचरेकर सरांच्या घरासमोर म्हणजे शिवाजी पार्क जिमखान्याच्या मागे आचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारासाठी एक गाडी ठरवण्यात आली होती. या गाडीमध्ये आचरेकर सरांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यावेळी सरांच्या पार्थिवाशेजारी त्यांचे सारे शिष्य उभे होते. सचिनही या गाडीमध्ये उपस्थित होता.
ही गाडी जेव्हा आचरेकर सरांच्या घराजवळून निघाली तेव्हा सचिनला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा गाडी सुरु झाली तेव्हा सचिनने आचरेकर सरांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यानंतर सचिनला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. एका हाताने त्याने आपले अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सचिन एवढा भावुक झाला होता की त्याला आपले अश्रू थांबवता आले नाहीत.
Web Title: When a board like shardasharma against England, Achrekar Sir feel proud
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.