महेंद्रसिंग धोनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जास्तीत जास्त वेळ संयम कायम राखत शांतचित्ताने निर्णय घेताना दिसला. पण अनेकदा असेही घडले ज्यावेळी ‘कॅप्टन कूल’ने तणावाच्या स्थितीत मैदानावर संयम गमावला.असाच एक क्षण लगेच आठवतो. कारण ही घटना अलीकडच्या कालावधीत घडली आहे. गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)सामन्यादरम्यानची ही घटना आहे. दरम्यान बीसीसीआयच्या एका माजी पंचाने म्हटले की, ‘त्यात पंच व धोनी दोघेही चुकीचे होते.’आणखी एका घटनेत धोनीने २०१२ मध्ये आॅस्ट्रेलियातील सीबी मालिकेदरम्यान पंच बिली बाऊडेनवर प्रश्न उपस्थित केला होता. तिसऱ्या पंचाने माईक हसीविरुद्ध यष्टिचित असल्याचा निर्णय दिला होता, पण रिप्लेमध्ये त्याचा एक पाय क्रिझमध्ये असल्याचे दिसत होते.टीव्ही पंचाची चूक मानून बाऊडेन यांनी ड्रेसिंग रुमकडे परतणाºया हसीला परत बोलविले. धोनीला हे रुचले नाही आणि त्याने न्यूझीलंडच्या पंचाकडे अंगुलीनिर्देश करताना नाराजी व्यक्त केली. अनेकदा असे घडले की, तो आपल्या संघातील सहकाऱ्यांना चुकी केल्यानंतर किंवा त्याला सल्ला न मानल्यामुळे फटकारत होता. त्याचे फटकारणे स्टम्प माईकद्वारे ऐकायला मिळत होते. इंग्लंडच्या २००९ च्या दौºयादरम्यान खेळाडूंची परेड विसरता येणार नाही. त्यावेळी उपकर्णधार वीरेंद्र सेहवागसोबत त्याच्या वादाच्या वृत्तावरून तो नाराज होता. त्यावेळी त्याने संघाची एकता व सांघिकतेबाबत एक वक्तव्यही केले होते. दक्षिण आफ्रिकेत २०१८ मध्ये एका टी-२० सामन्यादरम्यान त्याने फलंदाज मनीष पांडेला फटकारले होते. कारण तो अधिक धाव घेण्याच्या धोनीच्या कॉलकडे लक्ष देत नव्हता. कारण धोनी एकेरी धावा चोरण्यात माहीर होता. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही न्यूझीलंडमध्ये २०१४ च्या दौºयादरम्यान फटकारले होते. त्याने धोनीचा सल्ला न मानता बाऊन्सर टाकला होता आणि तो कर्णधाराच्या डोक्यावरून सीमापार गेला होता. शमीने अलीकडेच इन्स्टाग्राम चॅटवर लिहिले की, ‘माहीने मला कडव्या भाषेत सांगितले की, बरेच लोक माझ्यापुढे आले. बरेच खेळून परतले, माझ्यासोबत खोट बोलू नकोस.’बांगलादेशमध्ये २०१५ च्या वन-डे मालिकेदरम्यान धोनीवर वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला धक्का दिल्ला म्हणून सामना शुल्कातील ७५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता. एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धोनीने गोलंदाजाला धक्का दिला होता. मुस्तफिजुरवरही सामना शुल्काच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता. कारण तो धोनीच्या मार्गात आला होता.यानंतरही धोनीने एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत स्वत:ला सावरले, त्यामुळे त्याच्याप्रति आदर आहे.>चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्सदरम्यानच्या लढतीदरम्यान धोनी मैदानात दाखल झाला होता. सामन्याचे अखेरचे षटक होते आणि चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी १८ धावांची गरज होती. बेन स्टोक्सने फुलटॉस चेंडू टाकला आणि पंच उल्हास गंधे यांनी त्याला ‘नो बॉल’ असल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर अचानक आपला निर्णय बदलला. त्यामुळे धोनीचा राग अनावर झाला आणि तो मैदानात दाखल झाला. त्यामुळे त्याच्यावर सामना शुल्कातील ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. या घटनेची आठवण करताना पंच उल्हास गंधे यांनी फार भाष्य केले नाही. ते म्हणाले, ‘मी केवळ एवढेच सांगू शकतो प्रकियेचे पालन केल्या गेले.’>माही ‘माईलस्टोन’डिसेंबर २००४ : चितगाव येथे बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण.आॅक्टोबर २००५ : पहिल्यांदाच वरच्या स्थानावर फलंदाजीची संधी. वेगाने धावा काढण्याची योजना. वरच्या क्रमांकावर संधी मिळाल्यानंतर दुसºयाच डावात धोनीने १४५ चेंडूंत नाबाद १८३ धावा फटकावल्या. श्रीलंकेविरुद्धची ती मालिका भारताने निर्विवादपणे जिंकली आणि धोनी मालिकावीर ठरला.डिसेंबर २००५ : धोनीने चेन्नई येथे श्रीलंकाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.सप्टेंबर २००७ : राहुल द्रविडकडून टीम इंडियाचे नेतृत्व धोनीने स्वीकारले.सप्टेंबर २००७ : एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक बळी घेण्याच्या अॅडम गिलख्रिस्टच्या आंतरराष्ट्रीय विक्रमाची धोनीने केली बरोबरी. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकासाठी भारताची धुरा धोनीकडे. अंतिम सामन्यात पाकिस्तानला नमवून धोनी पहिला टी-२० विश्वविजेता कर्णधार बनला. अंतिम सामन्यातील अंतिम षटक टाकण्यास जोगिंदर शर्मासारख्या नवख्या गोलंदाजाला सांगितले आणि हे षटक निर्णायक ठरले.आॅगस्ट २००८ : भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ने धोनीचा सन्मान.नोव्हेंबर २००८ : भारताच्या कसोटी संघाची धुरा धोनीकडे. नागपूर येथे आॅस्टेÑलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेकडून धोनीकडे आले कर्णधारपद.डिसेंबर २००८ : धोनी आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू ठरला.मार्च २००९ : धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली.डिसेंबर २००९ : धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली.मे २०१० : धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्यांदा आयपीएल जेतेपद उंचावले.एप्रिल २०११ : श्रीलंकाविरुद्ध झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावांची शानदार खेळी करत धोनीने २८ वर्षांनी भारताला पुन्हा विश्वविजेतेपद मिळवून दिले. षटकार ठोकून विश्वविजेतेपद निश्चित करणारा धोनी एकमेव क्रिकेटपटू. अंतिम सामन्यात तोच ठरला सामनावीर.मे २०११ : धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने दुसºयांदा आयपीएल जेतेपद उंचावले.नोव्हेंबर २०११ : भारतीय सेनेने धोनीचा मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मान केला.मार्च २०१३ : ४९ कसोटी सामन्यातून २१ वा विजय मिळवत धोनीने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. यासह धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला.जून २०१३ : भारताने धोनीच्या नेतृत्वामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला.फेबुवारी २०१३ : कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने पहिले द्विशतक ठोकले.मार्च २०१३ : धोनीच्या नेतृत्वात भारताने घरच्या मैदानावर आॅस्टेÑलियाचा कसोटी मालिकेत ४-० असा धुव्वा उडवला.एप्रिल २०१८ : पद्मभूषण किताबाने धोनीचा सन्मान.मे २०१८ : धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नई सुपकिंग्जने तिसºयांदा आयपीएल जेतेपद उंचावले.जुलै २०१९ : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धोनी मोक्याच्यावेळी ५० धावांवर धावबाद झाला. भारताच्या पराभवातील हा निर्णायक क्षण. हा सामना धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.आॅगस्ट २०२० : सोशल मीडियावरुन धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘कॅप्टन कूल’ला राग येतो तेव्हा...
‘कॅप्टन कूल’ला राग येतो तेव्हा...
तिसऱ्या पंचाने माईक हसीविरुद्ध यष्टिचित असल्याचा निर्णय दिला होता, पण रिप्लेमध्ये त्याचा एक पाय क्रिझमध्ये असल्याचे दिसत होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 2:39 AM