कोलंबो : किशोर कुमार यांच्या गाण्यांचे चाहते बरेच आहेत. भारतीय क्रिकेट संघातही त्यांच्या चाहत्यांची कमी नाही. पिढी कुठलीही असो, पण किशोर यांच्या गाण्यांती भुरळ साऱ्यांवरच आहे. भारतीय संघातील ' हा ' क्रिकेटपटूही त्यांच्या गाण्यांचा चाहता आहे. श्रीलंकेत क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तो किशोर यांच्या गाण्यात एवढा ' मदहोश ' झाला की बीसीसीआयनेही त्याची दखल घेतली.
भारतीय संघात किशोर यांच्या चाहत्यांची कमी नाही. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा किशोर यांची गाणी आजही ऐकतो. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग करत फलंदाजी करत असतानाही किशोर यांची गाणी गुणगुणत असायचा. त्यामुळे भारतीय संघावर किशोर यांच्या गाण्याची मोहिनी बऱ्याच वर्षांपासून आहे.
श्रीलंकेत सध्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ शनिारी आणि रविवारी विश्रांती घेत होता. रविवारी सराव केल्यावर काही खेळाडू हॉटेलच्या लॉबीमध्ये बसले होते. तेव्हा या सुरेश रैनाने किशोर यांचे गाणे गायला सुरुवात केली. तो हे गाणं गाताना एवढा हरवून गेला होता की, हॉटेलच्या स्टाफलाही त्याने हे गाणे ऐकवले आणि एकच धमाल आली.
किशोर यांनी 1971 साली आलेल्या कटी पतंग या सिनेमामध्ये गाणी गायली होती. या सिनेमातील ' ये शाम मस्तानी, मदहोश किए जाए…' हे गाणे रैना अगदी तन्मयतेने गात होता. भारतीय संघातील काही खेळाडूंनीही या गाण्याचा आनंद लुटला. त्यामुळे रैनाने आता ऑक्रेस्टामध्ये गायला हरकत नाही, अशी मस्करीही काही जणांनी केली.