Join us  

MS धोनीलाही येतो राग! कॅप्टन कूलची 'बत्ती गूल' करणारी अनटोल्ड स्टोरी

त्यालाही राग येणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. फक्त त्याची खासियत ही की, तो अनेकदा आपल्या रागावर अगदी सहज नियंत्रण मिळवतो. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 2:47 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आपल्या शांत स्वभावाने ओळखला जातो. परिस्थितीती कोणतीही असली तरी कूल राहून प्रतिस्पर्धी संघाची बत्ती गूल करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळेच क्रिकेट जगतात त्याला कॅप्टन कूलची उपमाही देण्यात आली आहे. पण असा शांत माणूस जर एखाद्या वेळी चिडला तर भल्याभल्यांना अशा वेळी काय करायचं ते सूचत नाही.

होय; धोनीलाही राग येतो! 

धोनीसंदर्भातील किस्साही अगदी असाच आहे. पहिली गोष्ट धोनी हा देखील एक माणूस आहे. त्यामुळे त्यालाही राग येणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. फक्त त्याची खासियत ही की, तो अनेकदा आपल्या रागावर अगदी सहज नियंत्रण मिळवतो. पण सध्या त्याचा रागावरील ताबा सुटल्याची गोष्ट चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या धोनीच्या सहकाऱ्यानेच एका मुलाखतीत धोनीच्या रागाचा पारा चढल्याचा किस्सा शेअर केला आहे. 

त्याचा रागाचा पारा चढल्याचे पाहून ड्रेसिंगरुममध्ये पसरली होती शांतता

CSK चा माजी क्रिकेटर सुब्रमण्यम बद्रीनाथ याने धोनीसंदर्भात आश्चर्यचकित करून सोडणारा किस्सा शेअर केला आहे. आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्धचा सामना गमावल्यानंतर धोनी प्रंचड रागात दिसला होता. त्याच्या रागाचा पारा इतका चढला होता की, ते पाहून ड्रेसिंगरुममध्ये एकच शांतता पसरली होती.

कोणत्या मॅचवेळी नेमकं काय घडलं होतं?

सुब्रमण्यम बद्रीनाथ याने इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये घडलेली धोनीसंदर्भातील अनटोल्ड स्टोरी शेअर केली. तो म्हणाला की,  "चेन्नईच्या मैदानात आम्ही आरसीबी विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करत होतो. ठराविक अंतराने आम्ही विकेट गमावल्या. परिणामी सामना आमच्या हातून निसटला. त्यावेळी धोनीचा संयम सुटला होता. शेवटी तोही एक माणूसच आहे. रागाच्या भरात धोनीने पाण्याच्या बाटली लाथ मारत ती पार्कमध्ये पोहचवली होती. त्याचा हा रुद्र अवतार पाहिल्यावर ड्रेसिंग रुममधील सर्वच हैराण झाले होते. त्याच्यासोबत नजरेला नजर मिळवण्याचं धाडसही त्यावेळी कुणाचं झालं नाही, असे ब्रदीनाथ याने म्हटले आहे.

 या सामन्यात कुंबळेच्या गोलंदाजीवर मी पायचित झालो होतो, असा उल्लेखही बद्रीनाथ यानं केला. यावरून हा आयपीएलच्या पहिल्या हंगामातील असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर