Secret tie Break for Kieron Pollard : किरॉन पोलार्डसाठी चार संघांनी लावलेली समान बोली, मग कशी सिक्रेट टाय-ब्रेकमध्ये मुंबई इंडियन्सनं मारली बाजी, Video

Secret tie Break for Kieron Pollard : किरॉन पोलार्ड... मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का.. कर्णधार रोहित शर्माने जेवढे सामने मुंबई इंडियन्ससाठी खेळलेले नाहीत, त्याहून अधिक सामने पोलार्ड खेळला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:50 AM2022-02-01T09:50:08+5:302022-02-01T09:51:01+5:30

whatsapp join usJoin us
When four teams bid same amount for Kieron Pollard, Mumbai Indians won secret tie-break at IPL auction, Video  | Secret tie Break for Kieron Pollard : किरॉन पोलार्डसाठी चार संघांनी लावलेली समान बोली, मग कशी सिक्रेट टाय-ब्रेकमध्ये मुंबई इंडियन्सनं मारली बाजी, Video

Secret tie Break for Kieron Pollard : किरॉन पोलार्डसाठी चार संघांनी लावलेली समान बोली, मग कशी सिक्रेट टाय-ब्रेकमध्ये मुंबई इंडियन्सनं मारली बाजी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Secret tie Break for Kieron Pollard : किरॉन पोलार्ड...मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का.. कर्णधार रोहित शर्माने जेवढे सामने मुंबई इंडियन्ससाठी खेळलेले नाहीत, त्याहून अधिक सामने पोलार्ड खेळला आहे. सध्याच्या मुंबई इंडियन्सच्या संघात पोलार्ड हा जुना सहकारी आहे. Mumbai Indians साठी पोलार्ड किती महत्त्वाचाय हे वेगळं सांगयला नको... अखेरच्या पाच षटकांत ९० धावा जरी बनवायच्या असतील, तर या एकाच खेळाडूवर संपूर्ण संघ विश्वास ठेऊन डगाऊटमध्ये टेंशन फ्री बसलेला दिसतो. मुंबई इंडियन्सच नव्हे तर जगभरातील अनेक फ्रँचायझी लीगमध्ये तो आधारस्तंभ आहे... अखेरच्या षटकांत कौशल्यानं गोलंदाजी करण्याचे कसब ही त्याची आणखी एक जमेची बाजू आहे. त्यामुळेच पोलार्ड हा प्रत्येक संघाला आपल्या ताफ्यात हवाच असतो...

मुंबई इंडियन्सनं जिंकलेल्या पाचही आयपीएल चषकात पोलार्डचा वाटा हा मोठा आहे आणि त्यामुळे मुंबई इंडियन्स व पोलार्ड हे नातं घट्ट आहे. येणारे पर्व हे पोलार्डचे मुंबई इंडियन्सकडूनचे १३ वे पर्व आहे. मुकेश अंबानीची मालकी हक्क असलेल्या या फ्रँचायझीला २०१०मध्ये पोलार्डला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अन्य तीन फ्रँचायझींकडून कडवी टक्कर मिळाली होती. मग, सिक्रेट टाय ब्रेकमध्ये त्यांनी अखेर बाजी मारली. 

२००९च्या लिलावात पोलार्ड अनसोल्ड राहिला होता, परंतु २०१०मध्ये तो सर्व फ्रँचायझीला हवाहवासा झाला. मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाईट रायडर्स यांनीही पोलार्डसाठी जवळपास ७,५०,००० डॉलर्स ही बोली लावली. त्यानंतर सिक्रेट टाय-ब्रेकमध्ये पोलार्डचं ऑक्शन झालं आणि त्यात मुंबई इंडियन्सं बाजी मारली. ती रक्कम जाहीर केली गेलेली नाही.  

पाहा व्हिडीओ...

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडूनं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून १७८ सामन्यांत ३२६८ धावा केल्या असून ६५ विकेट्सही घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सनं २०११ व २०१४  मध्ये पोलार्डला रिटेन केलं आणि २०१८मध्ये त्यांनी पुन्हा लिलावात त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. तेव्हा मुंबईनं राईट टू मॅच कार्ड वापरून पोलार्डला ५.४० कोटींत घेतले.  आयपीएल २०२२मध्ये मुंबईनं संघात कायम राखलेल्या चार खेळाडूंमध्ये पोलार्ड आहे. त्याच्यासाठी मुंबईनं यंदा ६ कोटी मोजले आहेत. 

Web Title: When four teams bid same amount for Kieron Pollard, Mumbai Indians won secret tie-break at IPL auction, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.