Join us  

जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेत हत्या झाली तेव्हा भारतीयांनीही दुःख व्यक्त केले; इरफान पठाणचा 'यॉर्कर'

भारताच्या सार्वभौत्माचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सर्वांना इरफाननं अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉईड याच्या मृत्यूची आठवण करून दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 04, 2021 4:22 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय क्रिकेटपटूंमध्ये आता दोन गट पडत असल्याचे दिसत आहेइरफाननं अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉईड याच्या मृत्यूची आठवण करून दिली.

शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हीनं ट्विट काय केलं, भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आता दोन गट पडत असल्याचे दिसत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, प्रग्यान ओझा यांनी रिहानाचं नाव न घेता तिला अप्रत्यक्ष सुनावले. भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत, अशा एका आशयाचे ट्विट या क्रिकेटपटूंनी केले. पण, आता संदीप शर्मा, मनोज तिवारी यांच्यापाठोपाठ इरफान पठाण ( Irfan Pathan) यानं 'यॉर्कर' टाकून आपल्याच सहकाऱ्यांना क्लीन बोल्ड केले. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका

भारताच्या सार्वभौत्माचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सर्वांना इरफाननं अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉईड याच्या मृत्यूची आठवण करून दिली. ( कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!)  त्यावेळी कृष्णवर्णीयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करताना भारतीयांनीही त्या घटनेचा निषेध केला होता. त्याचाच आधार घेत इरफाननं ट्विट केलं की,''अमेरिकेत पोलिसाकडून जॉर्ज फ्लॉईड याची हत्या झाली, आपल्या देशाने योग्य रीतीने आपले दुःख व्यक्त केले.'' या ट्विटनंतर इरफाननं #justsaying असाही टॅग वापरला.  सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी ( Manoj Tiwari) यानंही असंच ट्विट केलं आहे. मी लहानपणी बाहुलीचा खेळ पाहिला नव्हता. त्यासाठी मला ३५ वर्ष वाट पाहावी लागली, असे ट्विट मनोजनं केलं आहे.   

     भारतीय गोलंदाज संदीप शर्मा यानं  ट्विट केलं की,''या लॉजिक नुसार कुणालाच कुणाची काळजी करायला नको. प्रत्येक परिस्थिती ही कुणाचातरी अंतर्गत मुद्दा असतो.'' 

टॅग्स :इरफान पठाणशेतकरी आंदोलनसचिन तेंडुलकर