Join us  

IPL 2023, Eliminator MI vs LSG: '...त्याला पूर्णपणे जबाबदार आहे'; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवाचे कृणाल पांड्याने सांगितले कारण!

IPL 2023, Eliminator MI vs LSG: मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा उभारल्यानंतर लखनौला १६.३ षटकांत १०१ धावांमध्ये गुंडाळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:25 AM

Open in App

संपूर्ण स्पर्धेत कमजोर गोलंदाजी म्हणून गणल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी मोक्याच्या वेळी दमदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज आकाश मढवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपरजायंट्सला ८१ धावांनी नमवत दुसऱ्या क्वालिफायर लढतीत प्रवेश केला. आकाशने लखनौचे कंबरडे मोडताना केवळ ५ धावा देत ५ बळी घेतले. मुंबईकर आता शुक्रवारी अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये भिडतील. 

मुंबईकरांनी पहिल्यांदाच लखनौला नमवण्याची कामगिरीही केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा उभारल्यानंतर लखनौला १६.३ षटकांत १०१ धावांमध्ये गुंडाळले. मार्कस स्टोइनिसचा अपवाद वगळता लखनौकडून कोणालाही झुंज देता आली नाही. लखनौकडून केवळ त्यानेच २० धावांचा पल्ला गाठला. मढवालने यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवताना प्रेरक मांकड, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान यांना बाद केले. लखनौचा अर्धा/ संघ ७४ धावांमध्ये गारद करत मुंबईने सामन्यावर घट्ट पकड मिळवली.

पराभवानंतर कृणाल पांड्या म्हणाला-

एका टप्प्यावर आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण जेव्हा मी तो शॉट खेळला तेव्हा सर्व काही चुकीचे झाले. आम्ही चांगले क्रिकेट खेळायला हवे होते. तो शॉट योग्य नव्हता, त्याला मी पूर्णपणे जबाबदार आहे. बॅटवर चांगला चेंडू येत होता. त्या मोक्याच्या वेळेनंतर आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही, असं कृणाल पांड्याने सांगितले. 

मेयरचा चांगला रेकॉर्ड-

क्विंटन डी कॉक हा दर्जेदार फलंदाज आहे, पण मेयरचा येथे चांगला रेकॉर्ड आहे, म्हणून आम्ही त्याच्यासोबत (प्लेइंग इलेव्हनमध्ये) पुढे गेलो. त्यांचे फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध खरोखरच चांगली फलंदाजी करतात, म्हणून मी त्यांच्याविरुद्ध फिरकी गोलंदाजीने सुरुवात करण्याचा विचार केला.

टॅग्स :क्रुणाल पांड्यामुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सआयपीएल २०२३
Open in App