Join us  

१०० नही आ रहा! जेव्हा Shubman Gill ने युवराज सिंगकडे मांडली कैफियत, बघा काय म्हणाला 'सिक्सर' किंग

वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यावर वन डे सामन्यांत मिळालेल्या संधीचं शुबमन गिलने ( Shubman Gill) सोनं केलं. गिलनं आतापर्यंत ९ वन डे सामन्यांत ७१.२८च्या ४९९ धावा केल्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:51 PM

Open in App

वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यावर वन डे सामन्यांत मिळालेल्या संधीचं शुबमन गिलने ( Shubman Gill) सोनं केलं. गिलनं आतापर्यंत ९ वन डे सामन्यांत ७१.२८च्या ४९९ धावा केल्या आहे. विंडीज दौऱ्यावर ९८ धावांवर खेळत असताना पावसाचे आगमन झाले अन् गिलला शतक पूर्ण करता आले नाही. त्याची भरपाई त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर केली आणि ९७ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारांसह १३० धावांची खेळी केली. भारताने तिसरा वन डे सामना १३ धावांनी जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली.   

शतकाच्या उंबरठ्यावर येऊन शुबमनला काही वेळा तिहेरी आकडा गाठता आला नव्हता. पण, वन डे तील पहिले शतक झळकावल्यानंतर २२ वर्षीय शुबमनने माजी फलंदाज युवराज सिंग ( Yuvraj Singh) याने दिलेल्या सल्ल्याची आठवण केली. युवीने दिलेल्या सल्ल्यामुळेच शतक पूर्ण करू शकलो असेही शुबमन म्हणाला.  शुबमनच्या शतकानंतर युवीनं त्वरीत ट्विट करून त्याचे कौतुकही केले.  युवीच्या भेटीबाबत शुबमन म्हणाला, झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मी युवराज सिंगला भेटलो आणि त्याने मला सांगितले की चांगली फलंदाजी कर व सेट झाल्यावर फटकेबाजीला सुरुवात कर. मी त्याला म्हणालो की १०० नही आ रहा है ( १०० धावा पूर्ण होत नाहीत) आणि त्याने उत्तर दिले की, काळजी करू नकोस, शतक होईल.''

शुबमन २२ वर्ष व ३४८ दिवसांचा आहे आणि झिम्बाब्वेत शतक झळकावणारा तो भारताचा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी रोहितने २३ वर्ष व २८ दिवसांचा असताना झिम्बाब्वेत शतक झळकावले होते. शुबमने १२३ धावा करताच हरारे येथे सचिन तेंडुलकरने २००१ मध्ये नोंदवलेला १२२ धावांची विक्रम तुटला. हरारे येथील ही भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शुबमन ९७ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार खेचून १३० धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेविरुद्ध ही भारतीयाची सर्वोत्तम खेळी ठरली आणि त्याने तेंडुलकरचा १९९८सालचा १२७* धावांचा विक्रम मोडला. 

 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेशुभमन गिलयुवराज सिंग
Open in App