IPL 2025 Auction Dates Announced: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामापूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता IPL 2025 बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी हंगामापूर्वी मेगालिलाव कधी आणि कुठे होणार, यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
रियाधमध्ये होऊ शकतो लिलाव
ANI च्या रिपोर्टनुसार, IPL 2025 साठी मेगा लिलाव या महिन्याच्या अखेरीस रियाधमध्ये होऊ शकतो. रिपोर्टनुसार, रियाधमध्ये २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान IPL चा लिलाव होऊ शकतो. मेगा लिलावात अनेक स्टार खेळाडू तुफान कमाई करतील अशी शक्यता आहे. यामध्ये जोश बटलर, एडन मार्करम, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, केएल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
४६ खेळाडूंना केलं रिटेन
मेगा लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी मिळून एकूण ५५८.५० कोटी रुपये खर्च करून ४६ खेळाडूंना कायम ठेवले. यामध्ये ३६ खेळाडू भारतीय तर १० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ३६ भारतीयांमध्ये १० अनकॅप्ड खेळाडू देखील आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधार श्रेयस अय्यरला, दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार रिषभ पंतला तर लखनौ सुपर जायंट्सने कर्णधार केएल राहुलला करारमुक्त केले आहे. अशा स्थितीत अनेक फ्रँचायझी या कर्णधारांवर लिलावात मोठी बोलू लावण्याची चर्चा आहे.
सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
- राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा.
- कोलकाता नाइट रायडर्स: रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग.
- मुंबई इंडियन्स: जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा.
- चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी.
- दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल.
- गुजरात टायटन्स: राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान.
- लखनौ सुपर जायंट्स: निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी.
- सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
- पंजाब किंग्स: शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग.