ठळक मुद्दे2008 ते 2011 या कालावधीत गॅरी कर्स्टन होते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकत्यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियानं 2010मध्ये आशिया चषक अन् 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकला
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीनं देशात अन् परदेशात भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्यानं 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011 वन डे वर्ल्ड कप आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. शांत आणि कुशल नेतृत्व असलेल्या धोनीनं अनेकांना प्रेरणा दिली. त्याच्या नैतृत्वकौशल्याची अनेक उदाहरणं दिली जातात. पण, धोनीबद्दल कधी न ऐकलेला किस्सा भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सांगितला आहे.
धक्कादायक; सौरव गांगुली होम क्वारंटाईन, कुटुंबातील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली धोनीनं 2008 ते 2011 हा काळ गाजवला. या कालावधीत भारतानं 2010मध्ये आशिया चषक जिंकला आणि 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकून 28 वर्षांची प्रतीक्षा संपवली. धोनीच्या नेतृत्वाबद्दल सर्वच बोलतात, परंतु एक माणूस म्हणूनही धोनी किती ग्रेट आहे, हे कर्स्टन यांनी सांगितले.''मी भेटलेल्या प्रभावी व्यक्तींपैकी धोनी एक आहे. तो एक दिग्गज लीडर आहे. त्याच्याकडे अविश्वसनीय नेतृत्वकौशल्य आहे. महत्त्वाचं म्हणजे तो प्रामाणिक आहे,''असे कर्स्टन यांनी एका यु ट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले.
यावेळी कर्स्टन यांनी धोनीसोबतचा एक किस्सा सांगितला. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीची ती घटना होती, जेव्हा कर्स्टन यांच्यासाठी धोनीनं आयोजकांशी पंगा घेतला होता आणि नियोजित कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. कर्स्टन यांनी सांगितले की,''तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. वर्ल्ड कप पूर्वी आम्हाला बंगळुरू येथील एका उड्डाण शाळेत निमंत्रित केले होते. त्यावेळी आमच्या सपोर्ट स्टाफमध्ये परदेशी सदस्यही होते. तेव्हा संपूर्ण टीमला बोलावले होते म्हणजे त्यात आमचाही समावेश आहे असे आम्ही गृहीत धरले आणि आम्ही प्रत्येकजणा त्यासाठी उत्सुक होतो. माझ्यासह पॅडी उप्टन आणि एरिर सिमन्स हेही होते, परंतु आम्हाला त्या शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. त्यांच्याकडून सुरक्षेचं कारण सांगण्यात आलं.''
''धोनीला हे कळताच, त्यानं संपूर्ण कार्यक्रमच रद्द केला. तो म्हणाला, ही सर्व माझी माणसं आहेत. जर त्यांना परवानगी मिळत नस्ले, तर आमच्यापैकी कोणीच जाणार नाही. असा आहे धोनी,''असे कर्स्टन यांनी सांगितले.
Web Title: When MS Dhoni cancelled a team event because Gary Kirsten was denied entry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.